स्वतःसाठी जरूर जगावं माणसाने,
पण स्वतःपुरतं जगू नये!-
जागतिक पुस्तक दिन
पुस्तकांची आवड केव्हापासून लागली हे आता आठवत नाही. पण बारावीनंतर प्रवास वाढला तेव्हा पुस्तकांनी खूप मोलाची साथ दिली. सहप्रवासी म्हणून पुस्तकं सतत माझ्यासोबत राहिलीत. मधल्या काळात पुस्तक वाचणं कमी झालं. आणि आता हळूहळू बंद होतंय की काय असं वाटू लागलं. पुस्तकांसोबतची नाळ तुटू नये म्हणून ऑनलाईन वाचू लागले. पण ऑनलाईन वाचताना पुस्तकांचा स्पर्श जाणवला नाही. कथेत रमता येत नव्हतं, भूमिकेत शिरता येत नव्हतं. मोबाईलच्या उजेडात फक्त शब्द दिसू लागतात, भावना पोहचत नाहीत. नंतर नवा प्रयोग म्हणून ऑडियो बुकचा नाद लागला. थोडे दिवस ऑडिओ बुक फार मजेशीर वाटलं. पण आता ऑडिओ बुक ऐकताना चित्त थाऱ्यावर राहत नाही. वाऱ्याच्या वेगाने तेही चहूबाजू फिरत राहतं. त्यामुळे जाणवलं, पुस्तकांच्या बाबतीत आपण कितीही तंत्रस्नेही झालो तरीही हाती पुस्तक येण्याचं आणि ते हवऱ्यासारखं वाचून काढण्यासारखं दुसरं सुख नाही. नव्या कोऱ्या पु्स्तकातून येणारा तो वास वाचण्यासाठी नवी प्रेरणाच देत असतो.-
अनेकदा असं होतं,
साचत राहतं बरंच काही,
सुचत राहतं, पण मांडता येत नाही
मांडता आलं तरी पोहोचत नाही
पोहचण्याची आस असते, कारण...
कारण काही सुचत नाही
अनेकदा असं होतं
साचत राहतं बरच काही
सुचत राहतं, पण मांडता येत नाही!-
एक गोष्ट पक्की कळली,
मनात चलबिचल सुरू असताना निर्णय घ्यायचे नाहीत,
चंचल वृत्ती जाणवली की शांत राहायचं,
मनात जे सुरू आहे ते सुरू ठेवायचं,
निरीक्षण करायचं,
भावना मारायच्या नाहीत,
वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या भावनांना
थांबवण्याचा प्रयत्न केला की जास्त त्रास होतो,
तत्वांच्या विरोधात जायचं नाही,
तत्व तुटली की भरकटतो माणूस, स्वैर बनतो,
दोलायमान स्थितीतही परिस्थितीकडे बघताना
डोळस होता आलं पाहिजे,
काय चांगलं, काय वाईट स्पष्ट दिसलं पाहिजे,
विचारांची गर्दी ओसरली की निर्णय घ्यावा,
शांत व्हावं, नितळ व्हावं,
वेळ द्यावा, वेळ घ्यावा हवंतर,
पण डोईजड होईल इथपर्यंत ताणू नये इतकंच!-
अचानक जुनी माणसं, मैत्र परिवार भेटला की बरं वाटतं. सोशल मीडियाच्या जगात आपण असतोच की कनेक्टेड. पण कधीतरी, कोणीतरी अचानक भेटलं की प्रसन्न वाटतं. Hi, Hello च्या पलीकडे संवाद झाला नाहीतरी माणूस दिसल्याचा आनंद असतोच. अशी ओझरती भेट व्हायला हवी नेहमी!
-
ना खत भेज सकती हूं
नाहीं कबुतर
ख्वाबो में आके मिलने का अच्छा रास्ता है!-
क्षण ओघळते ओघळते
तुझ्या माझ्या नात्यातले
क्षण विरघळून गेले अळव्याच्या पानावरले
-
हकदार हूं तेरी जिंदगी का ऐसा नहीं कहुंगी
पर एकबार हक जताना शुरु किया तो जिंदगीभर साथ दूंगी-