दुखविते कोण्या जीवा,
तीला "ओवी" म्हणू नये...
तेज दुसर्याचे दावी,
त्याला "रवी" म्हणू नये...
कात्रीने कापी गळा,
त्याला न्हावी म्हणू नये...
कवितेच्या करीतो चोऱ्या,
त्याला "कवी" म्हणू नये...
-
अकेलेही सीयासत थे,
अनपढोसें भरी 'बस्ती' नही थे वो...
'अस्थी' से पेहचान हो,
इतनी छोटी 'हस्ती' नही थे वो...-
प्रवाहाच्या विरोधात ,
मी लाचारांना नाही डरत...
उगाच नाही
मी विचारांवर प्रेम करत...-
दर्शन
पायांचे आणि तप्त डांबराच्या रोडचे घर्षण...
थारोळ्यात पाय
रक्ताचे वर्षण...
पुढच्या पिढीला
होईल असलेच आकर्षण...
कशाला हवय दर्शन...?
पुरे आहे तुमचे मार्गदर्शन...-
समतेच्या गप्पा हाणणाऱ्यांचा
विषमतावादी तोरा...
गाईच्या वाट्याला मिठी आणि,
बैलाच्या वाट्याला सुरा...-
कागदाला अश्रु फुटतात,
पेनही ढाळतो शाई...
जेंव्हा लिहायला बसतो "रमाई",
शब्द अपुरे पडतात आई...-
विचार माझे,
मर्यादीत नाहीत...
तुमच्या सारखे संकुचित,
माझ्या यादीत नाहीत...-
आज तुझ्या डोळ्यांत मला
दोन दशकांतलं अंतर दिसतंय...
बाळराजेंचं बाळ,
आतापासूनंच पँथर दिसतंय...-
संतांचे चांगले 'कर्म ' इथे...
जंतांना कुठे 'शर्म ' इथे...
नाही कसलाच 'मर्म ' इथे...
रंगाने रंगले 'धर्म ' इथे...-