कोई भी System बदलने की कोशिश मत करना, आपको और कोई चाहे तो खुदको बदलो! वही असरदार है, अच्छा है.
#Smitaraje-
आपण आपल्या गुरूंना जपलं पाहिजे..✨🥰
हर एक इंसान आपके भगवान को संभलता है|
आपण आपल्या देवाला जपणं..ही तर खुप मोठी परंपरा आहे, आणि ही परंपरा वर्षानुवर्ष पाहायला मिळत आहे. महाभारतात अर्जुन श्रीकृष्णाला जपताना दिसतो, रामायणामध्ये मारुतीराय श्रीरामाना जपताना दिसतात, अगदी चारशे वर्षे मागे जायचं म्हटलं तर स्वराज्यातला प्रत्येक मावळा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना जपत असताना दिसतात, 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे..' हे हृदयला भिडणारं वाक्य अगदी आजही अजरामर आहे. अगदी तसच, तीच परंपरा जपत आपणही आपल्या देवाला जपलं पाहिजे. इतराचं काय? आणि कोणाच्याही नजरेचं काय आपण स्वामींच्या नजरेत स्वच्छ असंण महत्वाचं! आपण प्रामाणिक आहोत, हे आपल्या देवाला माहिती आहे बास झालं..
नाही, आमच्या आयुष्यात तुमच्याशिवाय कोण आहे..
नाही आमच्या, आयुष्यात तुमच्याशिवाय कोण असणार आहे..
#Smitaraje-
असंच काहीतरी..! लिहायचं तर खूप काही आहे, पण का..? कसं..? कधी, नाही माहिती पण लिहायचं आहे खूप.. असं लिहायचं म्हटलं तरी सुचत नाही. सुरुवातीला शब्द कोणता आणि मग पुढे शेवटचं वाक्य काय घायच किंवा शेवट कसा करायचा.. काहीतरी, एखादयाच्या मनाला भिडणारं,जो कोणी वाचेल त्याला विचार करायला लावणारं, इतकं सुंदर आणि अप्रतिम काहीतरी लिहायचं आहे आणि लिहायचं असतं..
आयुष्यत खजिना काय असतो..?कदाचित तो आपला मानण्यावर असतो, खजिना काहीही असू शकतो, कोणी आजी-आजोबांना, त्याच्या सोबतच्या क्षणांना खजिना मानतो, कोणी मैत्रीला खजिना म्हणतात, कोणी भावाला, कोणी शांतता अनुभवण्याच्या क्षणाला खजिना मानतात, कोणी मुक्तपणे आनंदाने जगण्यात खजिना मानतात, कोणी रक्ताची नाती नसतात पण ती आपलीशी वाटणाऱ्या त्या माणसांना खजिना मानतात..✨🥰💯
#Smitaraje-
तू माझ्या आयुष्यात आहेस ना! पण मला प्रश्न पडलाय, मीही तुझ्या आयुष्यामध्ये आहे ना रे? गेली कित्येक दिवस झालं तुझ्याकडे एकच मागणं मागतोय आणि ते पण तू मला देत नाहीस, तुला खरचं माझी दया येत नाहीये का? अगदी लहानपणासून मी तुला माहितीये आणि मला तु माहिती आहे.. आतापर्यंत असं नाही कधी झालं की, तुझ्याकडे काहीतरी मागितलं, सांगितलं आणि तू ते मला दिलं नाहीस आणि मग आता तु असं का करतोस? माझ्या आयुष्यातून तु कधीही remove होऊ शकत नाहीस कारण, तू माझं सर्वस्व आहेस. मग काय मी तुझ्या आयष्यातुन remove झालीय का? नाही ना, मग का? माझ्याकडे तु लक्ष देत नाहीस, सांग की? तुझ्याकडे तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतात, तुझी योजना, तुझ नियोजन काय आहे, कसं आहे,नाही माहिती मला, पण 'तू आहेस' हे दोन शब्द पुरेसे आहेत. तुझ्याशिवाय आयुष्य म्हणजे पंखाविना पक्षी किंवा मग साखर नसलेला चहा.. प्रत्येकवेळेस स्वतःला हेच सांगत आलोय, तु आहेस, तु आहेस.. तु आहेस ना माझ्या आयुष्यात..
#Smitaraje-
डोळे ओले झाले म्हटल्यावर अश्रु खरे असतात असे नाही..
डोळ्यात पाणीच नाही म्हणजे भावनाशून्य आहे असं काही नाही..
नेहमी सकरात्मक आहे म्हटल्यावर नकारात्मक वाटतच नाही असं काही नाही..
काहीच बोलत नाही म्हणजे घमेडी असेलच असं काही नाही..
काहीच करत नाही, म्हणजे आयुष्याबद्दलची काही स्वप्ने नाहीत असं काही नाही..
एकटी असते म्हणजे चारचौघात राहायला आवडत नाही असं काही नाही..
बोलत काहीच नाही म्हणजे तक्रारी नाहीत असं काही नाही..
देवावर विश्वास आहे म्हणजे सगळं त्याच्यावरच सोडलं आहे असं काही नाही..
#Smitaraje-