Smita Saraf   (अस्मिता 🖋️)
83 Followers · 72 Following

Joined 28 June 2023


Joined 28 June 2023
4 HOURS AGO

मी भाग्यवान आहे, असं तो रोज म्हणतो
देवा, मी सुद्धा मग त्याचं म्हणणं खरं मानतो...

माझ्या घरचं सुख बहुधा त्याच्याकडे नसेल
लक्ष्मी आणि सरस्वती चा कसा मेळ बसेल...

अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी माझी रोज भटकंती
त्याच्याघरी मात्र अखंड शब्दसागराची तेवते पणती.

सुखाची व्याख्या आता त्याला कोण समजावेल
संचिताच्या धाग्यांवर नेहमी कोण विसंबून बसेल...

खरं तर, समाधानाचं मर्म उलगडता आलं पाहिजे
भाग्य,अभाग्याचं चक्रव्यूह भेदता आलं पाहिजे...

-


27 APR AT 12:36

सामना उन्हाचा,उन्हाशीच आहे
का थांबलास..तू ..तप्त प्रवासी आहेस...

वाट केव्हाच गेली अगतिक होऊन
सांग मना ही स्पर्धा कुणाशी आहे...

भेट जाऊन त्या नदीच्या सागराला
प्रतिबिंब नभाचे तेथल्या तळाशी आहे...

सावल्यांचे गाव आता राहिले मागे
खेळ पापण्यांचा ओल्या दवांशी आहे...

एक हाक काळजातूंनी दे किनाऱ्याला
उदयाचा रवी तेथेच त्या दिगंताशी आहे...

-


27 APR AT 10:21

शब्द लागले कळायला
दिसू लागले अर्थ...
सहवासात पुस्तकांच्या लाभला
जगण्याचा खरा भावार्थ...

-


26 APR AT 10:19

वसूंधरा ही रुसली
त्या काळ्या पडद्याआड
भेगाळल्या जखमांवर
उभारले आकांक्षी पहाड...

रुक्ष जाहल्या लतिका
वृक्षांनी टाकली मान
नदी,नाले आटले
उजाड झाले रान...

हिरव्या मखमालीची
मानवा केलीस हेळसांड
कशी रुजेल वंशावळ
कसे बहरतील माड...

आहे तुझ्याच हाती
सृष्टीचे पालन, प्राण
विस्तारण्या हा तरुवर
कर संकल्पाचे अनुष्ठान...

-


21 APR AT 17:15

वक्त को यही पर ठहर जाने दों
ऐ शाम मुझे और थोडा संवर जाने दों..



-


21 APR AT 10:38

पुन्हा एकदा वैशाखाला
वासंतिक स्पर्श मिळावा
तुझ्या माझ्या आठवणींचा
तो गुलमोहर बहरावा....

कृष्ण दिसावा कालिंदीला
लेऊनी पिवळा शेला
मृद्गंधाने भरुन यावा
अमृत सिंचित प्याला...

सांजकिनारी वाळूवरती
उमटावे अक्षर गीत
क्षितिजानेही गुणगुणावे थोडे
लाटांसवे संगीत...

माळुनी गजरा लावण्याचा
गंधाने हुरळून जावे
सदैव तुझ्या हृदयावरी
प्रतिबिंब माझे उमटावे...

-


19 APR AT 17:30

आठवणींच्या हिंदोळ्यावर
बसलेली ती सांज स्मरु
रुसलेल्या आभाळावर
चांदण्यांची बरसात करु....

अस्तित्वाच्या गाभाऱ्यातूंन
येणारा आवाज स्मरु
पणतीच्या तेजामधुनी
मनव्दंदावर मात करु...

विसरून सारे हेवेदावे
आयुष्य हे निर्व्याज करु
पुन्हा नव्याने रुजवण्यासाठी
मायेची फुलवात करु...

पदराला या बांधुन स्वप्ने
पंखांना अभिजात करु
चल सख्या नात्याची
एक नवी सुरुवात करु.....

-


19 APR AT 14:21

जरा लिहून पहावं, भावनांचं सदर
मनाच्या कप्प्यातूंन डोकावणारा कल्पनेचा पदर...

फेसाळणाऱ्या लाटांच्या डोळ्यातला सागर
तळपणाऱ्या आभाळाच्या मनातली बावर...

जरा लिहून पहावी,उन्हाची वणवण
सावलीच्या शोधात, हरवलेलं ते बालपण...

खिडकीच्या काचेवरली थेंबांची वर्दळ
रेंगाळणाऱ्या आठवणींचा वाहणारा तो मृगजळ...

अपेक्षांच्या चित्रावरून ओघळणारा पूर
अंगणातील तुळशीच्या गर्भी माजलेले काहूर..

जरा लिहून पहावी, प्रश्न उत्तरांची वही
हरवलेल्या स्वप्नातून पडणारा पाऊस बारमाही...

-


18 APR AT 11:32

शब्द माझा प्राण आहे, मिटणारे वाक्य नाही
प्रेम नावाच्या फुलाला,वयाचे वार्धक्य नाही...

एक तू,एक मी, सोबतीने चालतांना
हात हातात आहे, याविना दुसरे सौख्य नाही...

आळवितांना सूर मनांचे, रेखाटल्या संवेदनांचे
ओठांनी ही मूक व्हावे, एवढे विरहाचे भाग्य नाही...

सांधलेल्या जाणिवांनी,डोहात या विरुन जावे
भावनेच्या श्वासांना ही आता कसलेच वैराग्य नाही...

तू होतास,तू आहेस, रुधिरांच्या कंठामध्ये
विसरून तुला कधीच,जगणे मला शक्य नाही...

-


16 APR AT 17:31

अजूनही नजरे समोर आहेत
त्या दुभंगलेल्या वाटा
विभक्त होऊनही खुपणारा
त्या वेदनांचा काटा...

दूर जाणाऱ्या सावल्यांनी
दिला अखेरचा निरोप
भेगाळल्या मातीमध्ये
उन्मळून पडलेले रोप...

एकांतीचा प्रवास अन्
धूसर झालेले क्षण
कल्लोळ भावनांचा
शोधू कुठे तो श्रावण....

-


Fetching Smita Saraf Quotes