आहे त्या परिस्थितीत आपल्याला आपलं व्यक्तिमत्व राखता यायला हवं .
-
न असे मी कवयत्री न असे कोणी लेखिका
शब्दाशब्दांतूनी घडणारी मी एक काव्यप्रेम... read more
आठवते का तुला ?
तो वाराही बेधुंद झाला होता
गालावर रुळणाऱ्या बटांना
जेव्हा तो सावरत होता.
आठवते का तुला ?
बघणारा प्रत्येक जण तेव्हा
घायाळ झाला होता
जेव्हा कानात डुल घालून
तू साडीचा पेहराव केला होता-
समंदर की लहरों सी हो तुम
चट्टानों से बेखौफ टकराना जानती हो
आसमान में उड़ते पंछी जैसी हो तुम
खुद को आझाद रखना पसंद करती हो
हवा के झोंकों सी चंचल हो तुम
किसी की बंदिशों में रहना इन्कार करती हो
याद रखना , तुम वो वही लड़की हो
जो तुम में बसे हर सपने को हकीक़त में बदलती हो
-
बरेचदा आपण एखाद्या गोष्टीबाबत नाहक कल्पना जोडून तिला उगाचच किचकट बनवतो आणि मग एखादी गोष्ट किचकट किंवा कठीण हे गृहीत केली की मनात येते ती भीती आणि संभ्रम. ही गोष्ट अशीच झाली नाही तर...? आपण करू शकलो नाही तर ?...वगैरे वगैरे .!!. मुळात ना काही गोष्टींबाबत आपण अपेक्षा रहित राहिलो पाहिजे .एकदम भावनाशून्य .म्हणजे मनोमन ठरवायचं की जाऊदे ना चांगलं होवो की वाईट , आपण त्याचा आपल्यावर किंचितसा ही फरक पडू द्यायचं नाही . एकदम निश्चिंत ! मग बघा गोष्टी आपोआप सोप्या आणि सोयीस्कर वाटू लागतात .
-
शहराच्या ऐशाआराम श्रीमंतीपेक्षा , गावातल्या साधेपणात जास्त सुख समाधान नांदते
-
या शहराचा वेग , इथली झगडणारी अगणित माणसं , इथल्या इमारती , इथली जगण्याची शैली खरचं प्रत्येकाला स्वप्नांचे मनोरे आणखी उंच रचायला भाग पाडते . नाहीतर उगाचच लोक हिला स्वप्नांची नगरी का म्हणतील !!!!????
-
आपल्या अपयशाच खापर प्रत्येक वेळी परिस्थितीवर फोडून आपल्या चुकांवर पांघरून घालणारा माणूस कधीच पुढे जात नाही .
-
आपल्या दुःखात दुसऱ्यांच्या सहानुभूतीची अपेक्षा बाळगण्यापेक्षा , आपणच स्वतःहून आपला सावरणारा खांदा झालो तर जगातले कोणतेही दुःख किंवा संकट येवो आपला पराभव शक्य नाही .
-
इवल्याश्या हातांनी बापची बोटं धरून जगं फिरणं
ते पुढे त्याच थरथरत्या हातांचा आधार हो नं ....
खरचं याहून मोठं भाग्य साऱ्या जगात नाही !-
कधी कधी केव्हा केव्हा खूप लिहावसं वाटतं , व्यक्त व्हावसं वाटतं पण ते एकांतात म्हणजे कोणासोबत वा कोणाच्या समोर नाही भले आयुष्यात सुख दुख वाटणारा माणूस असेलही . पण तरीही काही क्षण हे फक्त स्वतः सोबत वाटावेसे वाटतात . पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात . केवळ एकट्याने . त्या क्षणांचा कोणी सोबती नसावा .त्या क्षणांचे साक्षीदार केवळ आपणच असावे .मनातील सारी घुसमट त्या क्षणांत विलीन व्हावी . अगदी नितळ स्वच्छ व्हावं मन .पुन्हा एका नव्या ग्रीष्म ऋतू साठी सज्ज होण्यासाठी .
-