बघितलेले स्वप्न पूर्ण
करण्याची जो
हिंमत बाळगतो ,
तोच खरा
माणूस !-
परस्त्रीचा मातेसमान आदर,
स्वराज्यात समान हक्क,
मराठी भाषेची जपणूक,
दुर्बलांना आधार,
गनिमी कावा चा बाप,
आणि मराठा साम्राज्याचा वाघ....
ते एक आणि एकच...म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत !
छत्रपती शिवाजी महाराज !-
Valentine Day दिवशी गर्लफ्रेंड ला
१००/- Flower bouquet देण्यापेक्षा
आई - बाबांना किमान १०/- एक फुल द्या,
नक्कीच सांगतो ,
गर्लफ्रेंड पेक्षा आई-बाबा जास्त
खुश होतील ....-
जात पात कधी नाही मानला
राष्ट्रधर्म तो श्रेष्ठ आम्हाला ,
कधीही तत्पर तो देशसेवेला
शहीद होण्याची भिती न त्याला ...
अश्याच पुलवामात शहीद झालेल्या
जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली !
-
स्वर माझे सूर देता
पाहता तुज कोलमडले,
ताल काय राग काय
भानावर ना राहिले .....
मला भेटलेली ती ......
-
समुद्रासारखी संथ ही नव्हती
नाही सुर्यासारखी ज्वलंत होती,
फुलापेक्षाही नाजुक कळी ती
फक्त माझ्या हृदयाचीच धडकन होती
मला भेटलेली ती.....-
अंधारात प्रकाशाची,
उन्हात सावलीची,
आणि
जीवनात सद्गुरुंची
नितांत गरज असते....-
फुलपाखरूच ते जणु
जिच्याशी माझी नाळच गुंफली ,
कधीही न विसरता येणारी
अशीच ती शेवटची भेट घडली ....
-
बाहेर जात असताना
मित्राला सांगितलेले कौतुकास्पद शब्द ..
जातो मित्रा,
मी आता तुला सोडून जातो,
लवकरच परत येईन,
तू यार आहे माझा म्हणून तुला सांगतो,
फक्त मी येण्यापूर्वी हाॅटेलची फक्त उधारी देऊन टाक...
😂😂😂-
आकाशी पाहून पतंगाचा नजारा ,
विसरून सारा आयुष्याचा पसारा ।
मनातील कडवटपणा टाका विरघळून ,
तीळगुळच्या आनंदात सर्व जा विसरून ।
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
-