शहराच्या गर्दीत कुठे आडोसा मिळाला की मनात विचारांचे कहर फुटतात,
दूर दूर उंच इमारती आणि निळभ्र आकाश शोधण्यासाठी डोळ्यांची तारेवरची ती कसरत,
कुठे तरी पाचव्या मजल्यावर गॅलरीत क्रिकेट खेळणारी ती लहानगी पोर,
सहाव्या मजल्यावरचे काका फार अस्वस्थ दिसले तूर डाळ समजून चणा डाळ आणली आज काही खरं नाही,
अठराव्या मजल्यावर कुत्रा भुंकत होता, मला फिरवायचं नाही तर पाळता तरी कशाला विचारत असेल,
नवव्या मजल्यावर उरलेलं आयुष्य आता ह्या खोक्यातच जाणार म्हणून खितपत पडलेल्या आजी आबांच्या नजरा,
बाराव्या मजल्यावर मात्र आई बाबा शांत दिसतात, अभिमानाने परदेशी गेलेली पोर हल्ली फ़ोन सुद्धा करत नाही हो,
तेराव्या मजल्यावर आपल्या नवऱ्याची वाट पाहणाऱ्या नजरा, ह्या पावसामुळे फारच उशीर होतो,
पंधराव्या मजल्यावर प्रेमरोग दिसतो प्रियकराची टक लावून वाट पाहणारी प्रेयसी, लवकर येईल तो प्रियकर कसला?
मजल्यावर मजले चढतच होते, आणि मनात किशोर कुमार ओळी गुणगुणत होत्या:
ज़िंदगी का सफ़र है ये कैसा सफ़र,
कोई समझा नहीं कोई जाना नहीं |
है ये कैसी डगर चलते हैं सब मगर,
कोई समझा नहीं कोई जाना नहीं ||
-शुभम संजय मोरे-
माणसाला प्रेम उसनवार घेता येत नाही, रात्रीच्या अंधारात उजेड पाडायचा म्हणून काजव्याला जन्म घ्यावा लागतो. आजूबाजूला व्यसनाधीन असलेल्या बार मध्ये कुठे तरी एक कोपरा पकडावा आणि कर्कश्श आवाजाच्या मधात कानावर तिचे ते शब्द पडावेत. अस्ताव्यस्त असलेल्या खोलीत दोन पुस्तके चार चिठ्या आणि न घडलेल्या पण कधी तरी घडतील अश्या शेकडो आठवणींच्या हुंकार असाव्यात।
वाघाच्या जंगलातही पाऊस पडतोच तस मगरगट्ट झालेल्या शहरात दहा पावलांवर झाडांची बाग शोधावी आणि तिथे आडोश्याला मनसोक्त गप्पा रंगवाव्या। रात्रीच्या थंडीत शेकोटी पेटवायला घ्यावी पण नेमकं इंधन संपलेलं असल्यामुळे तिला सोबतीला घेऊन इंधनाला जावं, आणि मग कुठेतरी पहाट व्हावी आणि मोहम्मद रफीच्या ओळी कानावर पडून स्वप्नातून जाग यावी।
तेरे मेरे सपने अब एक रंग हैं
हो जहाँ भी ले जाएं राहें, हम संग हैं||-
क्या तुम इतवार हो, फिर क्यू है इतना सुकून तुझमे,
या फिर तुम नवम्बर की थंडी शाम हो की झुमता रहू जीसमे।
क्या तुम बचपन की वो सुनहरी याद हो,
फिर क्यू है इतने खोये तुझमे,
या फिर तुम जुन की वो पेहली बरसात हो,
की भीग जाऊ मै जीसमे ।
क्या तुम मोहन के बासुरी का सूर हो,
फिर क्यू है मन अधीर तुम्हे सूनने के लिये,
या फिर बनारस का वो घाट
जीसमे कुद जाऊ मेरे पाप धुलने के लिये।
-
चार्ली च्यापलीन म्हणतो ह्या जगात स्थायी अस काहीच नाही, आपल्याला होणार त्रास ही नाही आणि आपण ही नाही। तरी पण मन का तळमळत? तिच ते रातराणीच मादक रूप, पुन्हा पुन्हा तृप्त करणारा तो आवाज, लाजाळूच्या पानासारखे मिटणारे डोळे आणि मग आजूबाजूचा तो कोरा करकरीत सुगंध... हा मोह तर नाही ना? पण मग आपसूकच आपल्याला उत्तर मिळत, आपलं अस्तित्व जरी स्थायी नसला तरी प्रेम मात्र अजरामर असेल, स्वतंत्र असेल।
आणि म्हणुनच साहिर लिहून गेले,
जहाँ मे ऐसा कोण है, की जीसको गम मिला नहीं,
अभी ना जावो छोडकर की दिल अभी भरा नही।-
नायकाला नायकत्व बहाल करायला किमान एक खलनायक आवश्यक असतो. प्रत्येक वेळेस तो खलनायक बाह्य व्यक्ती असेलच अस नाही कधी कधी तिच्यासाठी व्याकुळ झालेलं आपला अंतर्मन सुद्धा असु शकत. जणु काही रिमझिम पावसाची वाट पाहणारा चातकच. पण पावसाच्या सरी कधी चातकच्या होत नाही हे कळताच तो दूर अभाळवर उडतो। आणि मग दुष्यंत कुमारच्या कवितेच्या काही ओळी:
एक जंगल है तेरी आँखों में,
मैं जहाँ राह भूल जाता हूँ।
तू किसी रेल-सी गुज़रती है,
मैं किसी पुल-सा थरथराता हूँ।-
चरित्र जब पवित्र हैं तो क्यू हैं ये दशा तेरी,
ये पापियों को हक़ नहीं की लें परीक्षा तेरी |
- हरिवंशराय बच्चन-
हर एक दिल के साथ कई तिफ्ल तुटे है,
हर एक तिफ्ल के साथ कई आंधिया उठी है,
हर एक आंधी मे कई सौ गाव उजडे है,
हर उजडे हुये गाव के बच्चे बाहर शेहरो मे चल पडे,
फिरसे हर एक बच्चे के दिल तुटे है और कई तिफ्ल उठे है।-
पूर्ण तापलेल्या आगगाडीच्या इंजिनासारखं धडधडत असणारं हृदय त्या क्षणाला थांबवता यायला हवं. काही प्रश्न मनात घर करून जातात. त्या पाखरांची किलबिल ऐकणाऱ्या तिन्ही सांजेच्या रंगीत आभाळाला कधी टळलेल्या दुपारीची आठवण येत असेल का?
-
Just couple of hours to go for first ever Women's IPL, well there are no prizes for guessing which team I am supporting but what we all want is successful not only in terms of business but quality of cricket league to be. Till today cricket is very masculine dominant sport, but game can't grow after sometime if it is gender or country biased! Let's break the chain!
There are numerous interesting stories happened before 1st ball is played like Curious case of CSK not showing interest for women's IPL, Opening the doors for FMCG brands specially beauty, kitchen and feminine health for branding, breaking the jinx of business in Womens cricket, and so on but these we can discuss on some other day!
Let's Cheer for Biggest Sports League in the Making!-