Shubhaangi Patiil  
60 Followers · 8 Following

The Mind Writes To Express✍️😊
Wish me on My 🎂Day...1St Feb.
Joined 21 February 2020


The Mind Writes To Express✍️😊
Wish me on My 🎂Day...1St Feb.
Joined 21 February 2020
4 JUL AT 22:28

पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा
अनुभवलेले पावसाळे
खूप काही शिकवून जातात

-


3 JUL AT 19:52

पाऊस भरल्या ढगांचा वेगळाच देखावा असतो.,
बोलत नसलं कुणी तरी प्रत्येकाच्या
आठवणीतला एक पाऊस असतो

-


2 JUL AT 15:43

कोणत्याही Relation च्या Ship मध्ये
Involvement चा Load हा Equal असावा लागतो.,
कारण तो असला की Ralation हे Over Time
आणि Long Lasting टिकतं.

-


9 JUN AT 21:00

निरपेक्ष भावनेने केलं जातं
ते प्रेम असतं.,
आणि अपेक्षा ठेवून केला जातो
तो व्यवहार असतो.

-


7 JUN AT 2:33

शब्दांना फुटावं स्फुरण माझ्या_
अन् मी लिहायला घ्यावं.,
का बर इतकं छान तू असावं..??
निरागस वाटते तू म्हणून मी तुझ्याकडे बघावं.,
डोळ्यांचा तो प्रवास मी पापण्यांनी थांबवावं.,
का बर इतकं छान तू असावं..??
तुझं जवळ असणं हवंसं मला वाटावं
लाडानं अन् प्रेमानं मी फुलपाखरू तुला म्हणावं.,
का बर इतकं छान तू असावं..??
सांगावं वाटत तुला तू मिटल्या डोळ्यातही गोड दिसतेस.,
घातलेल्या कोणत्याही रंगात लोभस खुलून वाटतेस...
या ना त्या कितीतरी कारणांनी
कौतुक मी तुझं करावं...??
सांग मला...
का बर इतकं छान तू असावं..??

-


7 JUN AT 1:43

तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल...?
मी क्षणात उत्तरले,
मनात जपायला चाफा आवडेल आणि ओंजळीत धरायला मोगरा...
वहीत ठेवायला बकुळ आवडेल आणि धूंद व्हायला केवडा...
बोलायला अबोली आवडेल आणि फुलायला सदाफुली...
पण, प्राजक्त मात्र आवडेल तो, देवाच्या पायाशी ठेवायला... आशीर्वादासाठी...
यावर ती थोडीशी नाराज झाली.. कारण तिचं नाव रातराणी होतं...
मी ते ओळखलं... अन् पुढे झाले...
आणि हलकेच हसत म्हणाले, हे सगळं नंतर आवडेल...
रातराणी खिडकीशी दरवळल्यावर...!!
तेव्हापासून ती अखंड दरवळते आहे...
माझ्या मनात...अंगणात...अन् हृदयात सुद्धा...!!

-


7 JUN AT 0:41

चाफा असतो अबोल
सांजवेळ झाली की.,
माझं ही अगदी तेच होतं
तुझी आठवण आली की...,

-


28 MAY AT 21:14

अशा लोकांचे नाते कधीच बळकट होत नाही
ज्यांचे कान कच्चे असतात...

-


28 MAY AT 20:36

काय कौतुक करावं सरड्याच..??
इथे माणसांनी वेळेनुसार रंग बदललेले
मी पाहिले आहे.

-


28 MAY AT 20:32

काय कौतुक करावं सरड्याच..??
इथे माणसांनी वेळोवेळी रंग बदललेले
मी पाहिले आहे.

-


Fetching Shubhaangi Patiil Quotes