मी तुझिया दारा पुढती,
किति वेळ उभासा होतो
तू उघडून हलक्या हाती
हसशील पाहुनि, म्हणतो
मी फार पाहिली वाट
तू ऐकले नाहीस बहुदा
मी कडी ही वाजविली गे
अन हाक ही दिली कितीदा
तुज उमजत नव्हते का गं?
मी यत्न कितीचा केला
मी किती धाडली पत्रे
मी थकलो, मोजून वेळा
तुज दरवाज्याला आतून
कधी पाझर फुटला नाही
गे सखी तुला हा मित्र
आजवर ही कळला नाही
- श्रेयस परचुरे
-
There can only be two types of regrets in life...!
One Regret, which comes AFTER...
And another which one feels DURING the process...
That is your Mind telling you to question what you are doing. Or at best stop doing it...
Hardly worth doing, if you are even remotely regretting it at this moment...
-
पैलतीरी उभी माझ्या भावबंधाची मुक्तता...
ऐल तीरावर उभा मी, सोबतीला रिक्तता...
- श्रेयस-
There are two types of friends in life...
One who badgers you to make investments...
And another who helps you 'monitor' them...
Never let life lose the second one...!
-
एकवेळ तू नसताना मी, कसातरी तग धरतो,
मनात आहे एक छबी जी डोळ्यांपुढती स्मरतो...
परी सखे तू असूनही जर, भेट तुझी नसते घडता,
पुऱ्या बहरल्या आयुष्यातून एक एकटा उरतो...
केवळ दिसणे नसे पुरेसे, तुला स्पर्शता यावे गं,
हाती घेण्या तुझ्या करांना, राहून राहून झुरतो...
दिवस मावळे जाताना घरि, एक स्मित तव दिसता,
मला 'पामरा' सखे दिलासा, तितकासाही पुरतो...
- श्रेयस परचुरे
-
आठवतं का आपण दोघे,
असे भेटलो होतो मागे...
गूळ तिळाचे कारण देऊन,
बांधू पाहत होतो धागे...
असे सखे की गोडव्यातुनि,
माझे मानस तुला भेटुनि...
तव हाताच्या स्पर्शाने गे,
गूज मनीचे तुजला सांगे...
बघ ना, तुजला गे उमजे का?
तीळगुळ तुज का दिधला होता...?
पहा, अजूनही तुला सांगतो
गाठ बांधुया आपण अवघे...
- श्रेयस-
तुझीच येते आठवण, हे तुलाच मी सांगू कसे?
असूनही नसल्यासारखी, उणीव आज भासे...
दूर तू जाशील नक्की, वाटते आत्ताच भय
असूनही नसल्यासारखी, लावतो आता सवय...
- श्रेयस परचुरे-
जे जे म्हणूनि हवे जीवनी
ते ते गवसे असेच नाही
कधी डावपेचावर तुमच्या
क्षणात पसरे विरजण पाणी
सख्या एकचि आहे ह्यावर
तुला सांगतो खरेच उत्तर
जे जे म्हणूनि वांच्छिसि रे तू
लढू लढाया सतरा, सत्तर
जे जे म्हणूनि हवे जीवनी
इच्छा, ध्येय, माणूस आणि
त्याच्यासाठी लढण्यामध्ये
'लाज' जराही सखया नाही
- श्रेयस परचुरे
-
मुझे पूछतीं हो, हद से ज्यादा ख़ुश क्यों हो तुम आज?
तुम्हारा बस 'होना', यह वजह क्या काफी नहीं?
- श्रेयस-
यूँ तो औरों के साथ
जाने में मजा ही क्या है?
मैं तो बस चला जाता हूँ,
क्योंकि 'तुम' आ नहीं रही...
- श्रेयस परचुरे-