झेलली अचानक ही तिन्हीसांजेची उन्हे,
एकटीच मी अन् भोवतीची स्पंदने!
भेदरल्या मनात या आठवांचा पूर येतो,
आठवतो भूतकाळ अन् सतावतात प्राक्तने!-
#शिवकन्या_96k🚩
#MH09_कोल्हापूरकर🙏
#पहिलं प्रेम_कागद-पेन♥️💯
#तत्वनिष्ठ
प्... read more
वेदनांचे गिळून हुंकार
अश्रूही आता वीटून गेले,
नसते कधीच कोणी कोणाचे
मनास आता कळून चुकले!
खरंच आता असे वाटते
साथ द्यावी आर्त हाकेला,
भेदून नकार मला उमजले
आपणच असतो आपल्या सोबतीला!
-
भोवताल शांत असताना बुद्धीच्या पटलावर घोंघावणाऱ्या विचारांच्या प्रचंड झोताला योग्य वळण देऊन वादळाचे 'झुळूकांतर' करण्याच्या कलेला बहुदा 'छंद' हे नाव असावं!
-
खुदा के पास आपकी सलामत माँग ली है,
आपके बिना तो सबकुछ खाली है!
मेरे याँरो, हमेशा तक हमारे साथ रहना क्योंकी,
हमने जिंदगीही आपके नाम कर डाली है!
-
कई होसलों के आगे दुनिया भी फिकी सी है,
कई हसीं पलोंके आगे घडी भी रुकी सी है,
न जाने कितनी हस्तियाँ पली है इस मिट्टीने;
लेकीन आपके लफ्जोंके आगे कायनातभी झुकीसी है!-
ना होते आप और ना होती आपकी कलम,
क्या पता सफर तो सुहाना होता ही नही!
वरना थोडा-बहुत लिख तो हम भी लेते है,
मगर हमारे लफ्जोंमे 'गुलजार' कभी आते ही नही!-
अभिमान आम्हां अभ्येद्य सह्याद्रीचा
घाटी म्हणुनी गर्व जगण्याचा
कैक प्रदेश जाणले तरी
तिथे जिव्हाळा न मायभूमीचा!-
अलवार झेला या शुभ्र दवांना,
तनुवर हलकेच स्पर्शून घ्या!
विसरून नियतीची प्राक्तने सारी,
कोसळत्या सरींना बिलगून घ्या!-
सोड साथ खिडकीची,
कितीसा तग धरशील?
तिथेच वेळ दवडू नको;
नाहीतर गंज होऊन जाशील!-
सजे वैष्णवांची पंढरी
स्वयं परमेश्वर अवतरी
हर श्वास सेवेकरी
आषाढी मात्रनाम।
येता कसोटीचा काळ
स्मरावा विठू सर्ववेळ
दूर व्यथा त्या सकळ
करे हरिनाम।।-