माणसाचा स्वभाव ही त्याची ओळख असते दिसण्याचं काय ते कालांतराने बदलत जाते..
-
मनातलं______
मनातलं न सांगता ओळखणारी व्यक्ति भेटायला नशीब वगैरे लागतं हे ठीक आहे
मात्र ती व्यक्ती तुझ्या मनातील मनापासून ऐकायला तयार आहे का?
हे समजायला हवं….-
नातं
कुठलं ही नातं सांभाळताना कधी एकमेकांना सहाय्य करायचं असतं तर कधीतरी एकमेकांना सहन ही करावं लागतं.कधी एकमेकांना समजून घ्यायचं तर कधी समजवायचं, कधी बोलायचं तर कधी शांतपणे समोरच्याच ऐकायचं असतं.कधीतरी खुप काही सांगायचं असतं तर काही वेळा एकमेकांना अनेक प्रश्न विचारायचं असतं.नातं 'जपणं' हे कधी कधी इतकं कठीण वाटू लागतं तर कधी वाटतं किती सोपे आणि सहज आहे ते. नात्याचं नाव कुठलंही असो, प्रत्येक नात्यातं एक देवाण-घेवाण ही असतेच तरच ते छान खुलतं,फुलतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे "टिकत"...-
या मातीत शिवबांचे प्रेम रुजवावे लागतंच नाही, पाऊस पडल्यावर ज्या सहजतेने हिरवळ फुटून येते त्याच सहजतेने शिवरायांचा अभिमान मराठी मनात उमलून येतो...
-
आपल्या धर्माचं वेगळेपण हे वेशभूषेपेक्षा विचार आणि आचरणाने दाखवल्यास ते समाजोपयोगी असेल...
-
खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील
प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल.
आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
-