2 SEP 2019 AT 23:15

वेड्या मना गुंतू नकोस
गोठतील रे स्पंदने...
ही धग आहे वेदनेची
राख होतील स्वप्ने...
ओढ तुझी असूनही
आक्रंदतात भावना...
गोड ही अनुभूती
तरी आयुष्यभराच्या यातना...

... शोभा मानवटकर ...

- Shobha Bapurao Manwatkar