पहाटेच्या त्या
गुलाबी थंडीत ...
गवताच्या हिरव्याशार
पात्यांवर हिमतुषार...
जणू भासतात ते
ऊमेच्या गळ्यातील मोती...
जेव्हा उमा-शंकर एकांतात
रासक्रीडा करतांना...
आनंद पसरवतात या अवनीवर
त्यांच्या त्या हसी-ठिठोलीत...
ऊमेच्या गळ्यातील माळ
अलवार तुटून...
मोती पसरले त्या
पात्यांवरती...
स्वागताला उभे ते हिमतुषार
प्रभातीच्या समयी...
शोभा मानवटकर.....- Shobha Bapurao Manwatkar
15 DEC 2019 AT 22:06