3 AUG 2019 AT 11:27

क्षितिजापल्याड तो सुर्य
मावळणारा...
तसा तो जीवनप्रवास माझा
न संपणारा, न मिटणारा...
माझ्यातून दूर जाणारी
ती आकृती तुझी...
चिरत जाते काळीज
मी न राहते माझी...
कशी साद देऊ तुला
तू प्रतिसाद ना देत मला...
थांग ना लागे मनाचा तुझ्या
कशी गोंजारवू मी मनास माझ्या..
जाणे तुझे जिव्हारी लागते
कलम ही माझी रक्ताळते...
भासतो कधी तू जन्मोजन्मीचा सखा
क्षणात वाटतो तू अगदीच परका..
लेखणीतले शब्दही आता
विरहात तुझ्या गोठले...
सोडली साथ त्यांनी
ते ही पोरके आता झाले...

★ शोभा मानवटकर ★

- Shobha Bapurao Manwatkar