28 OCT 2019 AT 10:44

जीवनाच्या या रंगमंचावर
​प्रसंगानुरूप
​भूमिका
​ ती बजावली...
​कधी गोड
​तर..
​कधी आले
​ते कटू अनुभव..
​हळूच ते गेले
​स्पर्शून मनाला..
​लागले जिव्हारी
​तेव्हा..
​वेळ ही मग
ती ​विखुरली
​वाळूसारखी
​सांगितले कानात
​चुकले
​ते गणित आपुले
​पाहिलेल्या स्वप्नांची..
​कधी पाहता
​ते प्रतिबिंब आरशात...
​माझी मी
​न दिसे कुठेही
​प्रश्न तो परत
​पडे मनाला
​चढवता-चढवता
​मुखवटे भूमिकांचे
​अस्तित्वात उरले का मी माझ्या?

​ S.B.Manwatkar

- Shobha Bapurao Manwatkar