13 DEC 2019 AT 7:17

हृदयाची हाक माझ्या
​ऐक तू जरा...
​कर संवाद माझ्याशी
​दाटलेल्या भावनांना तुझ्या
​कर सैल जरा...
​कर संवाद माझ्याशी
​मनातल्या अनावर गोष्टींना
​येऊ दे अधरावर जरा...
​कर संवाद माझ्याशी
​हर्षाने नकळत पापण्यांनाही
​येईल माझ्या गहिवर जरा...

​ S.B.Manwatkar....

- Shobha Bapurao Manwatkar