1 SEP 2019 AT 0:23

दुरून का होईना
गवसलास तू आज
निष्पाप या नयनांना..
आतुरले होते बापडे
झलक तुझी पाहून
तृप्त झाले ते
निरागस मन...
आणि
भावनांचं ते आभाळ
अचानक दाटून आलं..
हिरव्या त्या
कोमल प्रितीने
हृदयात कोरलेल्या..
त्या भावनांचा
बांध फुटला...
नयनांच्या कडा
भिजवत
सीमारेषा ओलांडून
डोळ्यांवाटे
तो जलधारेचा
वर्षाव करत
सुखासीन त्या झाल्या...

... शोभा मानवटकर ...

- Shobha Bapurao Manwatkar