11 JUN 2020 AT 15:37

भिती कुणाची...
​तुझ्या त्या अधरांनी
​अधरांशी हलकेच
​अलगुज करतांना
​अमृतधारांनी निरंतर बरसावे...
​
​भिती कुणाची...
​अविलंब तुझ्या ​त्या श्वासांनी ​
​श्वासांना ​हळुवार झेलतांना
​कस्तुरी च्या सुवासाने
​तो मोहक सुगंध उधळावे...
​
​भिती कुणाची...
​तुझ्या त्या खट्याळ नजरेने
​नजरेशी ती मधुर हितगुज करतांना
​अलगद प्रेमात पडत
​रूक्ष ते वाळवंट बहरावे...
​
​भिती कुणाची...
​तुझ्या त्या निर्मळ मनानेच
​अबोल मनाला स्पर्श करतांना
अनगिनत ​भावना ही त्या गुंतवत
​जगण्याच्या वाटा वळवावे...
​
​ शोभा मानवटकर....
​

- Shobha Bapurao Manwatkar