अतूट त्या बंधनात तुझ्या अडकायला
मन माझे आतुरले...
मंतरलेल्या शब्दाने
अंतरंग ही माझे गंधाळले...
विसावले ते माझ्यात... जसे...
टिपूर चांदणे नभात....
खुळ्या भावनांच्या गोंधळणाऱ्या
कलकलाटात....
त्या पाझरणाऱ्या मनाच्या मार्मिक
निःशब्द चेहऱ्यात....
शोभा बापुराव मानवटकर...- Shobha Bapurao Manwatkar
7 DEC 2019 AT 9:33