असेन मी तिथेच
जिथे अस्तित्व तुझे...
तुझ्या हसण्यातलं
गोड हास्य बनून...
रूसण्यातला क्षणिक
रूसवा बनून...
सुन्या तुझ्या काळजातली
मंजूळ साद बनून...
तुझ्या त्या अपेक्षांचं
सुंदर स्वप्न बनून...
मूक तुझ्या भावनांचा
ओलीव स्पर्श बनून...
दुखऱ्या तुझ्या आठवांचा
प्रेम वर्षाव बनून...
लेखणीतील तुझ्या
शब्दांची प्रत्येक ओळ बनून...
असेन मी तिथेच
जिथे अस्तित्व तुझे...
शोभा मानवटकर....
- Shobha Bapurao Manwatkar
18 JAN 2020 AT 20:56