आयुष्याचं झाड
संसारात रूजतं
माझं माझं करत
जीवन हे जगतं..
जीवन एक खेळ
कळसूत्री बाहुल्यांचा
कधी तुटेल दोर
जीवन प्रवाहाचा..
नियती घालेल घाव
जिंकेल सारा डाव
निमित्त कुठलंही साधून
खाऊन जाईल भाव..
न कळे त्याला..
क्षणभंगुर हे आयुष्य
खेळ दोन क्षणांचा..
सोडूनिया स्वार्थ
आपल्यासाठी थोडं
दुसऱ्यांसाठी जगावं निःस्वार्थ...
... शोभा मानवटकर ...- Shobha Bapurao Manwatkar
26 SEP 2019 AT 0:46