24 FEB 2020 AT 17:32

आठवणींच्या गर्भात
​मन परत हरवलं..
​रित्या या जीवनात
​शमलेलं वादळ पुन्हा घोंघावलं..
​एक ती घटीका
​​भोवतालचं बदललं सार...
​शापित ते झाले जीवन
​मनावरती त्या नजरेचे कित्येक वार...
​ते ठीकाण मी गाठता
​उधाण आलं दुःखाला...
​तुझं हरवणं एक निमित्त
​सांगू रे मी कुणाला...
​पारदर्शी ते तुझे रूप
​मनात होते साठवले...
​भावनांची ती वर्दळ खूप
​शब्द मूक आता अश्रूच माझे बोलले...

​ शोभा मानवटकर...



- Shobha Bapurao Manwatkar