8 SEP 2019 AT 23:22

आठवणीच्या गर्भातील
आयुष्याचे वाचतांना
पाने पुस्तकाची...
न कळले ते
अर्थ शब्दांचे
शोधूनही ते
व्यर्थ च ठरले
निःशब्द ते अंतरंग..
आभाळ आठवणींचे
बरसून आले..
त्यात
काळीजही ओले..
जगतांना आता
जीवन..
नको त्या आठवणी,
नको त्या पानांचे
संदर्भ आणि दाखले
सोडून दिले सारे...

... शोभा मानवटकर ...

- Shobha Bapurao Manwatkar