शुभ्र साडीमध्ये दिसतेस काय भारी ,
अप्सराही फिक्या तू आहेस सुंदर नारी ,
मृगनयणी डोळे त्यात शोभते काजळी ,
गुलाबी ओठ वाटे गुलाबाची पाकळी ,
खळी पडते त्यावर ते गाल ही गुलाबी ,
मादक यौवन तुझे नशा चढते ही शराबी ,
दाट काळे केस ,अन गोड गुलाबी हसू ,
वाटतंय फक्त तुझ्याकडे बघत बसू ,
अदा पाहून तुझी मी पुरता दंग झालो ,
हृदयी माझ्या तुझे घेण्या रंग आलो .....-
Music lover
Birth date - 11 November
Cricket lover
Marathi Manus
On Instagram ... read more
सोड मौन आता उत्तर तू दे ,
अर्धवट बोलणं हे सोडून तू दे ,
बोलण्याचा तुझ्या मला अर्थ लागत नाही ,
विचार करून झुरतो मी , तरी तू मनातलं सांगत नाही ,
समोर नाहीस तरी ,कळत तुझं वागणं ,
मिश्किल माझ्या बोलण्यावर तुझं ,गुलाबी होऊन लाजणं ,
आहे जरी आपल्यात एक प्रकारचं अंतर ,
पन ह्रदयाला तर एकच ठाव , तुझ्या नावाचा मंतर ,
फक्त एकदा तू प्रिये ,ह्रदय ते खोल ,
भाव तुझ्या मनीचे मनापासून बोल-
बागेत होती एक फुलराणी ,
एकटीच हिरमुसलेली ,
नव्हते तिच्यासोबत कोणी ,
इतक्यात तिथे एका भ्रमराची स्वारी आली ,
बघून त्याला फुलराणी थोडी अचंबित झाली ,
जाऊन तिच्यापाशी भ्रमराने छेडले तराने ,
फुलराणीही मोहित झाली ऐकून त्याचे गाने ,
दोघे एकमेकात धुंद दंगुण गेले ,
प्रीतीचे पर्व नवे जणू रंगून आले ,
जाता जाता फुलराणीने पराग त्यास दिधले ,
पुन्हा परत येण्याचे वचन मात्र घेतले ........-
नक्षत्रावाणी दिसती बगा ,
अशी देखणी हाय ती नार ,
बगून तिच्या रुपड्याला ,
अप्सरांचा जळफळाट होतो की पार ...
माझं बी लै मन तिच्यावर्ती आलं ,
हसली जवा ती लाजून अशी ,
मन उडू उडू झालं ,
बोलत असली कमी तरी ,
लय हाय तिचा नखरा ,
सब्दात गुरफटून टाकतीया ,
तवा येतात मला चकरा ,
एवढं असलं तरी बी ,
रूप तिचच डोळ्यात उरत ,
आठवणीत तिच्याच बापड ,
रात रातभर झुरत ,
काय माहीत कवा सुत आमचं जुळलं ,
माझ्या मनातल्या पिरमाची खोली तिला कळल ....-
प्रेम गमावलं, पुन्हा होईल ,
मैत्री गमावली ,घरच्यांसोबत वेळ घालवा,
पण एक गोष्ट कधीच गमावू नका ,खूप अनमोल आहे ....
तुमचा स्वाभिमान-
उसको लगता है ,
मुझे कूछ काम नही है ,
अरे काम तो बहुत सारे है ,
पर उसे देखते रहना ,
मेरा पसंदीदा काम है ....
-
हा पाऊसही आठवणींसारखा झालाय ,
कधी केव्हा कसा ही येतोय ,
अवेळी .........-
मोहक कोवळे रुप ,
बघून हर्ष झाला ,
मधाळ मृगनयनी डोळ्यांचा तुझ्या,
खोल हृदयात स्पर्श झाला ....-
नसतील उत्तरे माझ्या प्रश्नांची तुजकडे ,
एकदा निरखून बघ जरा मजकडे ,
बोल तुझे ऐकण्या किती मी आहे ग आतुर ,
डोळ्यात दिसेल तुला आसवांचा पूर ,
अबोला तुझा अन मनात प्रश्नकल्लोळ उरतो ,
सांग ना मजसाठीपण जीव तुझा झुरतो ?
गीतातील शब्द माझ्या फक्त साद तुला देतील ,
बघ ऐकुनी ते ठाव तुझ्या मनीचा घेतील .......-
पुन्हा नव्याने पाहून तिला ,
मनाला हायसे वाटले ,
विरहात तिच्या किती युगे लोटली ,
नयनात अश्रुंचे मेघ होते दाटले ...
न बोलता न सांगता तिने दुरावा असा धरला ,
नन्तर मात्र जीवनात माझ्या दुःख सागर होता भरला ,
पण सोडला तिने रुसवा ,पुन्हा साद तिने दिली ,
हृदयाची बाग माझ्या पुन्हा प्रफुल्लित झाली ,
सुटणार नाही बंधन आता असा हात तिचा धरीन ,
प्रिय माझ्या रुपसुंदरीवर प्रेमवर्षाव करीन......-