26 JAN 2019 AT 16:43

बलसागर भारत होवो,विश्वात शोभूनी राहो
हे जगणे देशासाठी,तनमनधन हे राष्ट्रासाठी
मरणे ही मायभूसाठी,आम्ही सदा तत्पर आहो

वैविध्य इथे संस्कृती,आहे अगाध ही कीर्ति
सर्वांना लावितो प्रीति,नसे द्वेषाचा कुठे टाहो

एकोप्याने आम्ही राहून,हृदयाने सर्वास जोडून
शांतीचे प्रतिक होऊन,नाती दृढ करायाला हो

भारतवासी गुणांची खाण,चला करू नवनिर्माण
देशात आणू या प्राण,या कर्तव्य पूर्ण करा हो

संतांची ही भूमी जरी,प्रसंगी तलवार घेऊ करी
कर्तृत्वाने उजळे नगरी,तेज चहूदिशी पसरत राहो

मनी देशाचा अभिमान,करू तिरंग्याचा सन्मान,
गर्वाने उंचावूनी मान,अखंडित भारत देश राहो

शीतल विशाल यादव.

- शीतल विशाल यादव