जात धर्म पंथ प्रांत माणसाने बनवला,
देवाने तर माणूस बनवला...-
आजीची माया तिच्या सुरकुतलेल्या हातात, चुरगळलेल्या नऊवारी च्या पदरात, मळकटलेल्या बटव्यात आणि गोड मुक्यात लपलेली असायची...
-
मला सतत हसतमुख राहायला आवडत कारण,
मला नियतीला माझ्यावर हसू द्यायचं नाही...-
नवीन वर्षात बरंच काही नवीन संकल्प केले असतील, जमलं तर चांगला माणूस व्हायचा संकल्प करा...
-
मी स्वार्थी नाही
म्हणणारा दुसऱ्याचा फायदा किती हे मोजत असतो,
आणि हा स्वार्थी कधी कधी माझ्या जवळचाच असतो...
त्याला अपेक्षित त्याचा फायदा असतो,
आलेल्या भावात मला द्यावं हा त्याचा कायदा असतो...
मित्र भाऊ दादा सगळे फक्त शब्द असतात
आपलेपणा फक्त पैशांमध्ये असतो...
आपला माणूस मोठा व्हावा हे ब्रम्हज्ञान असतं,
ब्रम्हज्ञान देणारा कोणी साधसुधा नसतो,
दुसऱ्याचा फायदा किती ह्याचा शोध घेणारा
आपलाच कोणीतरी असतो....-
सदाफुली मध्ये सुगंध शोधायचा नसतो,
शोधायचा असतो तो साधेपणा सदा फुलत राहण्याचा...-
आधार नसलेली व्यक्ती बाहेरून जरी खंबीर दिसत असली तरी आतून पोखरलेली असते...
-
तिला विसरण्यासाठी
तिच्या सगळ्या वाईट गोष्टी आठवतो,
त्या गोष्टींमुळे प्रश्न जन्म घेतात.
आणि उत्तरं शोधण्याच्या ओघात,
तिला विसरायचं राहून जात...-
स्पर्श -
कधी वात्सल्याची उब देणारा
तर कधी वासनेची भीती दाखवणारा...-