शब्दयात्री   (गायत्री)
95 Followers · 36 Following

Joined 22 June 2018


Joined 22 June 2018

जसं जसे वर्ष सरत जातात,काळानुसार किती बदलतं ना सगळं..!! दिसणं आणि असणं ही बदलत जातं. सोबतच्या माणसांचं आणि आपलंही. काल परवाच एक जुनी सीडी पाहण्यात आली आणि स्वतःमध्ये कमालीचा बदल जाणवला. अगदी ही मी आहे..!! असा प्रश्न मनात यावा इतका बदल. पण का आणि कसं होतं असं? नक्की काय बदलतं किंवा असं काय घडतं जे आपल्याही नकळत आपल्याला आतून बाहेरून एवढं बदलून टाकतं? अगदी वाईटच असं नाही. काही बदल चांगलेही असतात पण मला नेहमी या गोष्टीचं नवल वाटतं आणि काही अंशी वाईटही की, का काही गोष्टी, काही नाती, काही माणसं कायमस्वरूपी जसच्या तसं राहत नाही? मागे वळून बघितलं की, तेव्हा किती छान होतं असच मनात येतं. सरून गेल्याची हळहळ का दाटते मनात? काहीतरी खूप मौल्यवान गमावल्याचा सल मनात का उरून राहतो? आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरही का नसतात? शोधण्याचा प्रयत्न केला तर आपणच हरवून जातो..एका अनामिक वाटेवर..!!

-



चल पड़ खुदके साथ किसीकी तलाश न कर
हकीकत को अनदेखा न कर तु काश में जीकर

-



हमें और जीने की
चाहत ना होती
अगर तुम न होते
अगर तुम न होते

-



नाराज़ क्यू हो हमसे
किस बात पे हो रूठे
अच्छा चलो ये माना
तुम सच्चे हम है झूठे

-



ए मेरे हमसफर
एक जरा इंतजार
सुन सदाये दे रही है
मंजिल प्यार की

-



काही नात्यांना नाव नसतं..ना ते एका विशिष्ट साच्यात बसवता येतात.मैत्री, प्रेम ह्या मर्यादेच्या, जाणिवेच्या पल्याड ते पोहोचलेलं असतं. सतत सोबत असत नाहीत, ना रोज बोलणं होतं, ना विचारपूस, ना गमती जमती, ना रूटीन रिपोर्ट..काही काही नाही.. कधीतरी अगदी खूप दिवसांनी फक्त एक "साद" येते अन् तितक्याच ओढीने, आत्मीयतेने "प्रतिसाद"ही.. आणि बोलणं सुरू होतं. अगदी आतलं.. वाटत असलेलं, आंतरिक दाटलेल.. ना आड पडदा ना अवघडलेपण असतं.. निखळ मनमोकळा संवाद होतो आणि मनावरचं मणामणाचं ओझं अलगद उतरवल जातं, हलकं वाटतं.. तेवढा क्षण बस तेवढाच वेळ.. अन् मग जो तो ज्याच्या त्याच्या वाटेला.. आपापल्या विश्वात..पुन्हा कधी भेटू, बोलू हे जाणून न घेता प्रवास सुरू.. परत कधी बोलू माहित नसलं तरी पुन्हा हीच साद आणि हाच प्रतिसाद असणार हे नक्की माहित असतं.. किती भारी असतं हे नातं आणि असं एक नातं प्रत्येकाच्या आयुष्यात असावच असावं..

-



वो कहता गया और वो मानती गई। क्युकी खुश देखना चाहती थी उसे। चाहती थी की खुशी ना सही मगर परेशानी न बन जाऊ उसकी जिंदगी की। फिर एक मोड़ पर वो मुड़ गया, आगे चला गया, पिछे मुड़कर भी नही देखा उसने.. और तब एहसास हुवा, खुद को गवा बैठी है वो। उसका दिल रखते रखते खुद का दिल कहा रख दिया यही भूल गई हैं।अपना सन्मान, स्वाभिमान, अपने आप को ही भूल गई वो। अब बस...ये अब और नहीं होगा। ठान लिया मन में, अकेली रहूंगी, कोई साथ न हो ठीक है उनकी मर्जी। अब अपने स्वाभिमान के साथ रहूंगी और खुश रहूंगी।

-



ठीक हु...



खुश हु...

-



जाणतो मी सारेच
तू म्हणतो असे
काय उरात दाटे
मी शब्दात सांगू कसे

-



कुणी आपली जन्माची, रक्ताची नाती सोडून येते आणि जन्मापासून सोबत असल्यासारखी नवी नाती आपलीशी करते तर कुणाला जन्मापासून सोबत असलेल्या आपल्याच रक्ताच्या नात्यात स्वारस्य नसते. नाती जपणं तर दूरच ती टिकण्यासाठी देखील काही धडपड, तडजोड करण्याची तयारी नसते. ज्याची नाती आहेत त्यालाच ती नको आहेत हे लक्षात आल्यावर जोडीदार ही त्यांना महत्व का देईल? जन्मदात्यांशी दुरवाचे बहुतांशी कारण हेच असतं.. आणि काही मात्र जसे आपले तसेच हे असं म्हणून वेळोवेळी तडजोड करून स्वतःला समजावून नात्यांना टेकू देत राहतात.
सारेच अनाकलनीय..!!

-


Fetching शब्दयात्री Quotes