निघालोय परतीच्या प्रवासाला
सोडून तुझे शहर
बघ ना कसा होतो आहे
नयनांवरती अश्रूंचा हा कहर
घेऊन जातोय इथून मी
खूप साऱ्या आठवणी
होईल कधी मग भेट आपुली
विचार हाच मनोमनी
तुझ्या शिवाय राहणे
मला तरी जमणार नाही
तुझ्या विना मन माझे
इतर कुठेही रमणार नाही
देतोय तुला वचन मी
सोडून तुला जगणार नाही
आले कितीही संकटे तरी
तुला मात्र जपणार आहे
✒️शब्दयोग- @Yogesh Gaikwad (Y.G)-
प्रकाश संघर्षाचा चोहीकडेचं आहे
मनात अस्तित्वाचा काळोख दाट आहे
काळजात आठवणींचा कल्लोळ माजला आहे
नयनातल्या अश्रूंचा आता बांध फुटला आहे
अदृश्य सावल्यांचा मनी भास होतो आहे
त्या स्तब्ध पावलांचा आता त्रास होतो आहे
कोणास ठाऊक नेमका
जगण्याचा अर्थ काय आहे
तुमच्या माझ्या आयुष्यातला
हाच तो #अस्तित्वाचा संघर्ष आहे...
(संघर्ष अस्तित्वाचा... To be Continued)
🖋️शब्दयोग..-
प्रत्येकाच्या जीवनात असाही एक प्रसंग असतो,
हव्याशा वाटणार्या गोष्टींच वरदान काही केल्या मिळत नाही पण काही नकोश्या वाटणार्या गोष्टी चा शाप मात्र प्रत्येकाच्या माथी छापलेला असतो.
... जसं की सुख आणि दुःख...
सुखाच्या मखमली चादरीवर वर सर्वांना आपल सबंध आयुष्य व्यतीत करावस वाटत पण प्रत्यक्षात मात्र काळजात तीक्ष्णपणे बोचणार्या वेदनारुपी काट्यांचा संघर्ष प्रत्येकाच्या ललाटी लिहलेला असतो..
म्हणुन त्या काट्यांची सवय करा... कारण फुल (सुख) हे एकदिवस कोमेजणारच आहे.. परंतु तो काटा (दुःख) मात्र तसाच राहणार आहे, काळजामधे संघर्षाचा वणवा पेटवत..🔥
(संघर्ष अस्तित्वाचा... To be Continued)
🖋️शब्दयोग-
ही आयुष्याची वाट नेमकी जाते कुठे
कधी स्वप्नांच्या मायानगरीत,
तर कधी अस्तित्वाच्या फाटक्या झोपडीत,
कधी सुखांच्या उंबरठ्यावरून,
तर कधी दुःखांच्या वेदनांवरुन,
ही आयुष्याची वाट नेमकी जाते कुठे
कधी मायेच्या छायेकडे,
तर कधी तिरस्काराच्या धारेकडे,
कधी नयन दीपणार्या त्या लख्ख प्रकाशातून,
तर कधी जीवनाच्या त्या रहस्यमयी अंधारातून,
ही आयुष्याची वाट नेमकी जाते तरी कुठे...
(be Continued...)
🖋️शब्दयोग...
-
तुझ्या डोळ्यांतील अश्रू दे,
दुःख वाटून घेताना,
आठवणींच एक पुस्तक दे,
त्यात तुला वाचताना..॥३॥
म्हणूनच तर म्हणतोय की,
फार काही मागत नाही
फक्त तुच हवी आहेस
तु'झ्याचसाठी जगताना..॥४॥🌹
✒प्रतियोग...-
सुखे वेचताना अंतरी हा आभास आहे
पोटाची खळगी भरण्यासाठी
कवडीमोल किमतीत विकलेला तोच माझा श्वास आहे,
आयुष्याच्या बाजारात वावरताना वाट्यास आलेल्या
दुःखांच्या वेदनांचा जीवघेणा हा त्रास आहे,
सुखे वेचताना अंतरी हा आभास आहे..
#संघर्ष अस्तित्वाचा...(To be continued...)
✒️शब्दयोग-
कसे जुळले बंध हे
मनालाही उमजेना
आपुलकीच्या सहवासात
बोलल्या शिवाय राहिना
कधी जवळ तु
भेट अशी का घडेना
कधी आभास तु
ओढ ती का संपेना
वेळ कशी ही
तुझ्याविना जाईना
क्षण - क्षण मोजावे तरी
आठवण तुझी कमी होईना
असे कसे नाते हे
शब्दही त्यास सापडेना
भाव माझ्या मनातले
तुला शब्दाविना का कळेना
-Rachana nandeshwar-
ति'ला काहीच न सांगता देखील
ती जाणून घेते मनातील सर्वकाही
कदाचित हृदयाने ति'ला श्वास मानल्याचा
हा परिणाम असावा..-