बार बार नहीं आता हर लम्हा जिंदगीमे
खुल के जिओ हर पल जो रहे यादमे-
प्रखर ऊन आणि त्यात सौम्य पाऊस... दुग्धशर्करायोग ....इंद्रधनू तर येणारचं
अगदीं तसच प्रखर अडचणी आणि त्यांना सौम्य विचारांची जोड असेल तर जीवनात आनंदाचा पाऊस जोरदार पडणार
सप्तरंगी इंद्रधनू तुम्हाला रंगमय करणार
फक्त योग जुळवून आणावा लागतो अट इतकीच
-
एक थेंब पावसाचा
पावसाचा एक थेंब तोंडात पडावा
म्हणून आ वासून मेघाकडे बघणारी मी
त्या एका थेंबाची अगदी चातकाप्रमाणे
वाट बघणारी मी....
आता मात्र फार वाट बघू शकत नव्हते
त्या एका थेंबाची
सहनशक्ती चा अंत झाला होता
आणि माझ्या इच्छेचा भंग
निराशमानेन परतत होते
तो मोर मात्र बेधुंद नाचत होता
त्याच्याच विश्वात
का?
मी जरा भानावर आले
माझं सर्वांग चिंब झालं होतं
एका नाही असंख्य थेंबानी
मला मनसोक्त भिजवल होतं
मला अपेक्षेपेक्षा खूप दिल होत त्या मेघाने
त्याकडे लक्ष देण मात्र माझं काम होत
जे त्या मोराला अचूक जमलेलं
वा!!!पाऊस पुन्हा सुरू झाला
माझा विचारही आता मुक्त झाला
सप्तरंगी इंद्रधनूने स्मित केले
त्या बेधुंद मोरासवे ....
मी ही नाच केला
थेंब नाही...सरी नाही...तर पाऊस होऊन
मनसोक्त....
-
आव्हानांना जात सामोरे
सुर्यासारखे पेटत रहायचे
संकटे करतील परिभ्रमण
तू स्वयंप्रकाशी चमकत रहायचे
लुकलूकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे
असतात आठवणी दुःखाच्या
तेजानेच स्वतःच्या अस्तित्व त्यांचे संपवायचे
तू स्वयंप्रकाशी चमकत रहायचे
दाही दिशांना अंधार जेव्हा
आशा असते त्याला तुझी
प्रकाश पसरवणे कर्तव्य समजून
तू स्वयंप्रकाशी चमकत रहायचे
परप्रकाशी त्या ताऱ्यांप्रमाणे
क्षुल्लक तुझं अस्तित्वव नाही
स्वयंप्रकाशी तू आहेस तारा
चमकत रहा दिशांना दाही
#poweredbyself-
When our hearts are matched
There is no mean to success and failure....
Not only in cricket match but also in reality
# cosmopolitan
-
आठवणी देऊन जा अशा काही की..
तुला मी सुचत जाईन आणि
मी तुला लिहीत जाईन
-