यू तो गुमनाम लगती है...
बस थोडे दोस्त, थोडी यादे
पल भर हसीन बनाती है....-
I am :- Journalist.... Librarian...
Hobby :- writing, Reading, drawing,& social wo... read more
दिवासा मागून दिवस गेले,
उन्हाळे पावसाळे कैक झाले,
अनुभवांनाही सुरकुत्या पडल्या,
सुख दुःखाच्या ही फेऱ्या घडल्या,
पण काळ कधी कुणासाठी थांबला नाही..-
मेरी रूह की आदतसी बन गई है..
हमे यादों मे दिवाना बना के
खुद नाजरोंसे ओझल हो गई है...
-
न बोलता ही कळावे गुपित मज मनातले
हृदय अंतरीचे स्वर कसे सांग तुज उमगले..
घेवून स्वप्न सप्तरंगी मनाच्या क्षितिजावरती
त्या स्वप्नांचे मर्म कसे सांग तुज उमगले....-
....अवकाळी पाऊस...
असा कसा रे निष्ठुर झालास,
हाता तोंडांशी आलेला घास
तू का हिरावलास... ??
शेतकऱ्याच्या नशिबी तू असा
वनवास का दिलास... ??
उन्हा तान्हात,वादळ वाऱ्यात
बिचारा राबत होतो,
इवल्याशा पोटासाठी घाम
मातीत पेरत होतो..
किती वेडी आशा होती
घामाचे मी करील मोती,
लिकीचे हात पिवळे करून
लेकासाठी एक सायकल
घ्यायची होती..
पण तू असा निष्ठुर झाला
दनादणा आला,मुसळधार आला
वावटळीच्या सोबतीने गारांचा सडा
माझ्या अंगणी घातला..
आता सांग ना काय केला मी गुन्हा
तुझ्या भरवशावर मी कसे
जगु पुन्हा पुन्हा...-
बोलतात ही फुले एकांतात माझ्या मनाशी
कधी कधी अंतरंगातल्या वेदनांशी...
नको असलेल्या आठवणींना
पुन्हा आणून ठेवतात पापण्यांशी...-
आज मुद्दतो बाद कूछ लिखने का मन कर रहा है..
क्योंकी आज आँखो के साथ कलम भी आंसू बहा रहा है...-
सरते शेवटी आयुष्याला नवी
कलाटनी द्यावी म्हणतोय,
रटाळवाण्या आठवणींना
तिलांजली द्यावी म्हणतोय..
नवी ऊर्जा,नवी स्फुर्ती घेवून
पुन्हा आयुष्य जगु म्हणतोय,
भूतकाळात रमणाऱ्या मनाचे
उडणारे पंख छाटु म्हणतोय...
खुप झाली तीच ती रडगाणी
झालं गेलं सोडून देवून म्हणतोय,
नव्या वर्षाला नवीन कल्पना घेवून
येणाऱ्या संकटांशी धीराने लढू म्हणतोय...-
आता गुलाबाची सावलीही
माझ्या अंतर्यामी उमटली
याच गुलाबाच्या सोबतीची
एक जूनी आठवण उरी दाटली...
-
चांदण्या रात्रीला कुणी तरी शब्द दिला होता..??
आज आक्खी रात्र जागुन काढली पण
या मोकळ्या नभात ना शब्द देणारा होता ना चंद्र होता..-