ShambhuPriti   (©Shambhupriti✍️)
51 Followers · 29 Following

शंभू वर जडली जिची प्रीती..
ती शंभूप्रीति....

🎂17july
Joined 31 July 2024


शंभू वर जडली जिची प्रीती..
ती शंभूप्रीति....

🎂17july
Joined 31 July 2024
5 HOURS AGO

वरवर शांत दिसणारं पाणी,कधी अचानक घेई रौद्ररुप...
ऐकण्याची सवयच नव्हती त्यांना, आता माझ्या नकाराचही अप्रूप....!!!

-


5 HOURS AGO

तुझ्या मनीच्या खोल सागरी केल्या कैकदा सफरी.
वरवर शांत अथांग पण तू सैरभैर अंतरी...

-


15 JUL AT 20:07

हाती घेवून मेणबत्ती
मेलेल्यांचे स्मरण करायचं...
मग त्याच मेणबत्तीस,
वाढदिवसदिनी विझवायचं...???
वागणं हे साऱ्यांचच
विरोधाभासी...
वास्तव सोडून,
जगणं झालं केवळ आभासी...

-


15 JUL AT 18:42

नीरव शांतता चहूकडे,
दिवे मालव प्रखर तेजाचे...
धर माझी कविता हाती,
अवखळ चंद्र किरणांखाली...
शब्दसुमने वाचता माझी,
का ग झाली पापणी ओली..
तू स्वतः स बसविले,
प्रतिकात माझिया...
अन् माझ्या मनीच्या भावना,
क्षणात रंगल्या रंगात तुझिया..

-


15 JUL AT 18:35

बाहेर पसरला शांत सागर फेसाळणारा...
अंतरी मात्र त्याची गाज,अन् वारा घोंगावणारा....

-


15 JUL AT 18:32

हताश होऊन नाही बसायचं ,येऊ देत कसलही वादळ...
संकटांना जोडीनं भिडूयात,तूझी साथ हेच माझं बळ...

-


15 JUL AT 18:25

तुला हवं म्हणून,
मी ही वास्तवात यायचं ठरवले...
तुझा विचार मनी येताच,
तुझ्या स्वप्नी हरवले ...

-


15 JUL AT 12:11

जन्मदात्यांचे ऋण विसरली,
तुझ्या प्रेमापुढ रक्ताची नाती हरली..
गेली मुलगी घरदार सोडून,
तुला हवं म्हणून...
मायबापाची मान झुकली,
अपमान, टोमण्यानी ती थकली..
कशी काय मुलगी चुकली...
अश्रूंचा पूर मागे ठेवून,
गेली मुलगी भावंडं सोडून,
केवळ तुला हवं म्हणून..
पण तू खरच तिला जपशील?
की एक दिवस तुकडे करून,
फ्रीज मध्ये कोंबशील??
दुसर कुणीतरी,
तुला हवं म्हणून...

-


15 JUL AT 11:57

ती रडता रडता हसली...
तुला हवं म्हणून..
बेबंद च होती ती,
मात्र चौकटीत बसली.
तुला हवं म्हणून...
अवखळ वाऱ्यापरी विहरायची,
मात्र थबकलेली दिसली..
तुला हवं म्हणून......
निर्झरासम खळखळून हसायची,
मात्र उसणेपणान हसली...
तुला हवं म्हणून....
का बदलली????
अल्लड पणीच पोक्त झाली..
का ????
तर तुला हवं म्हणून ....

-


15 JUL AT 7:09

✨✨✨✨✨✨
वाढदिवसानिमित्त उदंड
आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...
🍫🍫🎂🍫🍫
आई भवानी तुम्हाला
उदंड आयुष्य देवो...
✨✨✨✨✨✨

-


Fetching ShambhuPriti Quotes