26 NOV 2020 AT 11:46

अवखळ वारा,थंड गारवा
मौन गोठले,नयनात चांदवा.
नव आयुष्य, नवीन वाटा
पाय मातीत,जुनाच काटा

स्वप्न सारे,आवेग आशेचा
हात जुनाच सोबती हवा.
चाहूल नवनगरीची
सुख,दुःख एकत्र आभासी.

भासास आभास होतो
या आभासी जगाचा.
स्मरणात श्याम,त्यागात राधा
चालती आहे नवीन वाटा
चालती आहे नवीन वाटा.

- ✍️शब्दशालिनी