कधी झुळुक येते स्पर्शुनी जाते अनामिक वाऱ्यापरी
विसरून जाते मन दुःख सारे स्वभाव वेगळा दर्पणापरी
अध्यात्माने माखलेला अन् अंधश्रद्धेचा राग तया
कोष उसवत पाखरू होतो जगण्याचा शोधतो रंग नवा
असा मित्र हृदयी निळी निळाई पसरवत जातो
डोह मनाचा खोल जरी भरता तो ही उरत राहतो
पहाटे शशी सर्वकाळ चंदू सोबती असता तमा नसावी
साधक तू संगीताचा तू साधनेचा वारकरी
लेखणी हाती बीज पेरते राष्ट्रप्रेम पसरवते दाही दिशा
निष्ठा मनी प्रत्येका प्रती उमटते प्रतिकृती सावलीतही
ज्ञानाचा लगाम हाती त्यातून बरसती संस्कार मोती
चिंतन मनन सूत्र तयाचे अबादित राहते विवेक बुध्दी
-
शब्दशालिनी ☘️☘️☘️
पाण्याच्या एका थेंबाचे बारीक थेंब होतात
तेच थेंब झेलताना मनात तरंग उठतात
पाणी जीवन आहे, अन् ह्रदयात प्राण आहे
ह्रदय तुटल्यावर सांगा, परत घांव का घालतात🙄
-
जर प्रत्येकाला आयुष्यात तुकोबा होता आलं तर किती भारी ना. संसार आणि अध्यात्मात गुंतलेल्या व्यक्ती एका ठिकाणी स्थिर तर एका ठिकाणी आभासी भासतो.दोघांचा ताळमेळ घडून जगणं तसं फक्त तुकोबाला जमलं.
खऱ्या अर्थाने तुकोबाने भक्ती आणि कर्म शिकवले.फळ काय याची तमा नाही. परंतु सर्वस्व देताना कर्तव्याचा हात काही सोडला नाही.
सामान्य माणूस हेच आयुष्य जगत असतो परंतु उद्भवणारे प्रश्न आणि होणारा तणाव, आपल्यातील तुका पर्यंत पोहोचण्या आधी मुका होऊन जातो आणि कदाचित त्यामुळेच सर्व काही निरुत्तरीत राहत असावं असं मला वाटते.-
क्षणात आली भरती अशी
क्षणात मनास बिलगून गेली
क्षणात झाले रान मोकळे
क्षणात स्मरणी गर्दी झाली
क्षणा क्षणांना साठवणारी
क्षणात वाटले सर्व आपुले
क्षणात कधी एकटी पडले
क्षणात सर्व विखुरलेले
क्षणात कैद जीवन सारे
क्षणात उरती धागे-दोरे
क्षणा-क्षणांशी वेळ खेळते
वेळेत सरतात क्षण हे सारे
-
सांग आपल्या भांडणात
कोणाचं वाईट झालं?
माझ्या मनाला पडलेल्या भेगा पाहून
तु ही रागावून कोसळतच होतास
तु खाली आला सर्वत्र बरसला
तुझ्या माझ्या प्रेमाचा अंकुर मातीत उगवला
शेतकऱ्याच्या मनाला दिलासा तू देत होता
कुठं काय बिघडलं सांग आपल्या भांडणात
भांडण होतातच रे म्हणून काय रुसायचं नसतं
रुसवा-फुगवा असला तरी वाईट कोणाचं होत नसतं रागावला तर रड रड रडू लागला पण शेवटी
रडून झाल्यावर माझ्यातच एकरूप झालास-
सांग कोणी पाहिले, दिवसा तारे नभातले
भेग पडली काळजाला, भाव दिसले का आतले-
शायराना अंदाज, चेहरे पे हंसी
घांव सहकर बनी वो असरदार दावा है माई
सबको जिवन का उद्देश दिखानेवाली
नव निर्मिती की निमित्त है माई-
बेजुबान होते है शब्द
जब दिल कूछ कुछ केहता है
सुन्ने वाले सूने या ना सुने
अपना दिल सच कहता है
विश्वास है हमारा
हम पर और कलम पर
दुनिया लाख नजरअंदाज करे
एक दिन उनको भी नजर आयेंगे-
आरजू को तराजू में तोलने का वक्त क्यों आता है ?
रोते आंसु को, बहाने का मौका क्यों मिलता है ?
हंसी गुम होती है, तो क्या देख नहीं पाते आप
फिर भी समझने में इतना समय क्यो लगता है-