Shailesh Nanal   (Shailesh Nanal)
159 Followers · 6 Following

Joined 28 August 2019


Joined 28 August 2019
7 HOURS AGO

जीवाचे दुसऱ्या जीवाशी संबंध हे बहुतांशी रुणानुबंध, व्यवहार व गरज यातूनच निर्माण होतात.वरवर ते जिव्हाळ्याचे आणी आपुलकीचे दिसले तरी कालाधीनच असतात.काही काळानंतर त्यात बदल होउन ते संपुष्टातही येत असतात.मात्र सद्गुरुशी भक्तीच्या माध्यमातून येणारे संबंध मात्र भावमधुर व कालातीत असतात त्यामुळे ते जेव्हढे दृढ आणी घट्ट होतात तेव्हढाच त्यातील गोडवा व माधुर्य हे वृध्दींगतच होत राहाते.

-


YESTERDAY AT 13:24

Enlightenment simply downloads truckload of AHA moments in the normal routine and insipid life making it interesting and livable.

-


YESTERDAY AT 13:03

Point of enlightenment is not a final stop.The journey towards higher and higher dimension of a cosmic consciousness continues till the whole eternity is scaled over.

-


YESTERDAY AT 11:17

तपपूत आणी विशुद्ध भूमिकेतून लिहीलेली आध्यात्मिक पुस्तके ही मूलतः सुंदर असतात. तथापी त्यातील गूढ आणी सुक्ष्मतम असा बोध ग्रहण करण्यासाठी व त्यातील शुद्ध अशा भक्ती सौंदर्याचं आकंठ रसपान करण्याकरीता साधकाला उन्नत अशा आत्मजाणीवेत स्थिर असावे लागते.

-


YESTERDAY AT 9:54

An enlightenment is a sacred art of arriving at self easily and effortlessly.

-


YESTERDAY AT 9:40

जब जब कर्म ईश्वर को शत प्रतिशत श्रध्दाभाव से समर्पित किया जाता है

-


YESTERDAY AT 9:37

शुद्ध आणी निष्काम भक्ती ही एक अलौकिक अशी गोष्ट असते जी ईश्वरतत्वाच्याही अतीत असलेल्या मृदू, मुलायम अशा गुरुतत्वाशी मंगल असा संबंध साधून देते.तदनंतर साधकाला त्याच्या जीवनात जवळजवळ सर्वच स्तरावर दिव्य असे अनुभव येऊ लागतात.

-


30 APR AT 8:49

मनाची मूळ प्रवृत्ती ही दृष्य जगात आसक्त होण्याचीच असते.दृष्य जगात मन सारखं सुख शोधत असते.अनेकवेळा इंद्रीयसुखाचा वारंवार अनुभव घेऊनसुद्धा मन समाधानी होत नाही कारण ते बहीर्मुख असते.उपासनेने मनाची बाह्य जगात भरकटत जाण्याची वृत्ती अंतर्मुख करावी लागते तेव्हाच आत्मदर्शन घडते व मन हळूहळू आत्मस्वरूपात लय पावते व शाश्वत शांती व समाधानाची दिव्य अशी अनुभूती साधकाला प्राप्त होते.साधनेला विरोध करणारे मन या स्वस्वरुपातील शांतीसुखाचा अनुभव घेण्यासाठी आता साधकाला सर्व तर्हेने सहकार्य करु लागते.

-


28 APR AT 21:40

एकटेपणा हा भयावहअसतो.एकटेपणाची भावना ही फक्त जीवाला होते शिवाला नाही कारण शिव हा स्वात्मतृप्त व निरानंदच असतो.जीव हा शिवतत्त्वाचा स्पर्श होईपर्यंत अपूर्ण आणी एकटाच राहतो.भक्ती हा तो एकटेपणा कमी करण्याचा व जीव आणी शिवा मधील अंतर कमी करण्याचा जागृत प्रयास असतो.

-


28 APR AT 20:27

आध्यात्मिक आविष्कार ही परमेश्वराने दिलेली पोचपावती असते.

-


Fetching Shailesh Nanal Quotes