रिते रिते मन भासे वाटे व्यर्थच सारे
तुझ्याविना कसे मांडू सांग जीवनाचे हे पसारे
-
चाफा अंगणी अलगद खुलला
मनी आठवणींचा गंध दरवळला
निखळूनी स्वैर येऊनी माझ्या
ओंजळीत तो मंद मोहरला-
आयुष्यात संगत चांगली असली कि,
विचार चांगले होतात आणि
विचार चांगले झाले कि, आयुष्य !!-
सत्याच्या मार्गाने चालणारे लोकच नेहमी असत्याच्या मार्गाने चालत असतात.
कटू पण सत्य-
प्रतिबिंब माझं आज उमगल मला तुझ्यात
अगदी डोळ्यात डोळे समरस झालेलं
जून असून सुद्धा नव्यानं जुळलेलं,नव्यानं सापडलेलं.-
आठवत का तुला तुझी मैत्रीण सोबत चालत असताना
गपचुप मागून तुझा हात हातात घ्यायचो मी,आणि तू मंद गालात हसून समोर बघत चालयचीस-
घे साठवून सार डोळ्यात ,
उद्या तू असशील ,मी नसेन
तेव्हा तुला ह्याच आठवणी उपयोगी येतील.-
पोरक केलंस....
पै पै करून सगळ साठवलं होत
एक वेळ पोटाला चिमटा काढून घर माझं जगवल होत!
होत त्यात समाधानी होतो
स्वतःकडे नसल तरी न रडता दुसऱ्यांचे अश्रू पुसत होतो!
छोट असल तरी माझ्यासाठी खास होता
घर न्हवत ते फक्त आमच्या राजा राणीचा तो महाल होता!
होत न्हवत सार नेलस ,
घरच्यांपासून मला पोरक केलंस!
आजूबाजूचे विचारपूस करायला येतात ,जेवण पाणी देतात आणून
नको जेवण पाणी मला ,मला माझी माणसं देता का आणून?
एकटा पडलोय सगळ्यांशिवाय कुणीतरी सांगा रे जाऊन!!
चिखलात शोधतोय कुठे जाणवतोय का श्वास कुणाचा
कसा सांग तू ?घेऊ मी बदला या पुराचा!
डोळ्याच्या कडा सुकल्या ओ रडून रडून
काय करू एकटा तरी झुरून
आता वाटतंय घ्यावं स्वतः ला पण या मातीच्या ढिगाऱ्याखाली पुरून!
होत्याच न्हवत केलंस
होत्याच न्हवत केलंस
सांग ना का? मला पोरक केलंस?
-
आर्त हाक माझी ऐक पांडुरंगा
खात आहे माझे मला मन !
पाहुदे या डोळा नेत्र सुख
उभा टाका आता देह
घेत नाम तुझे येईन सोबत
न पडो तुझ्या नामाचा विरह !!
लागला तुझ्या नामाचा हा छंद
भजनात तुझ्या होऊ देरे दंग !!
-
नाव तुझे घेता कृष्णा सरे रितेपण माझे
माझे उरले ना काही सर्व झाले भगवंता तुझे !!
-