"अलक"
त्याचा गोडवा.....
"मला गोड कधी आवडलंच नाही.....
पण त्याच्या आठवणी आजही साखरे सारख्या विरघळतात."
शब्दवेडी-
"अलक"
न संपलेला संवाद....
"त्याच्या नि माझ्यात कधीच वाद नव्हता
पण शेवटच्या क्षणी संवाद घडलाच नाही...."
शब्दवेडी-
"अलक"
"उधळलेलं आयुष्य"
"वाटलं आयुष्य मोठं आहे.....
पण त्याच्या सोबत निवांत क्षण जगायचे राहिलेच"
शब्दवेडी
-
"अलक"
जिवंत आठवण....
"ती रोज माझ्या फोटोला फुलं अर्पण करते…
मी अजूनही जिवंत आहे."
शब्दवेडी-
दाबून ठेवलेल्या हुंदक्याचा आक्रोश कधी होतो कळत नाही
ज्यानं बाप गमावला त्याला मोकळं होऊन रडता ही येत नाही
बाप नेहमीच पोलादी दिसत राहिला आणि आईत दिसली गाय
बाईत असलेली आई उमगते पण पुरुषातला बाप कळणं सोपं नाय
आई विव्हळली की टचकन डोळ्यात पाणी येतं
बापाचं विव्हळणं काळजात असतं
बापाला वाटत राहतं पोरांना माझी कदर नाही
कारण आई सारखा त्याला पदर नाही
आयुष्यात ही दोनच नाती अशी आहेत
ज्याला कशाचीच सर नाही
शब्दवेडी-
तू आवडतोस तू आलास की मन प्रसन्न होतं
पण अवकाळी आलास की मात्र मन धास्तावतं
तेव्हा ही तू तसाच आला होतास ऐन दिवाळीत
जेव्हा माझ्या आयुष्यात अंधार पसरला होता
शब्दवेडी-
जखम सांधायला सुई धागा मिळाला खरा
पण वेळ निघून गेली अन् साथ अपुरी पडली
आता अर्धवट जखमेचं आणि
दिसणाऱ्या व्रणाचं काय करु
शब्दवेडी
-
आज मावळतीच्या सुर्यालाही
जणू सोनचाफ्याचा कैफ चढला
उगीच नाही निघता निघता
तो त्याच्या रंगात रंगून गेला.......
शब्दवेडी-
तुझ्यासोबत जपलेले क्षण
तुझ्यासोबत अनुभवलेले क्षण
तुझ्यासोबत जगलेले क्षण
आणि याला साक्षीदार तो पाऊस
शब्दवेडी-
चहा म्हणजे मी तू आणि
मनाची कवाडं उलगडणाऱ्या गप्पा
रेंगाळलेल्या त्या क्षणांचा
हळूवार जपलेला चोर कप्पा
शब्दवेडी-