Sãtish Rãván  
21 Followers · 11 Following

read more
Joined 9 April 2018


read more
Joined 9 April 2018
25 MAR AT 20:41

काळ्या आणि पांढऱ्या छटांमध्ये सुद्धा
सप्तरंग शोधण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे..

#शब्द_गंध💫
#SrSatish🎭

-


13 MAR AT 19:37

"सतिश नंदा शामराव रावण"

#SrSatish🎭

-


4 MAR AT 20:02

Think of the world without words.


#SrSatish🎭

-


24 FEB AT 21:15

दीनानाथ मंगेशकर यांनी अखंड गाण्याच्या
चाली बदलल्या.. त्यांचा अधिकारच होता तो

पण इकडे आम्ही आमच्याच नावात
एखादी वेलांटी जरी मागेपुढे केली तरी
बाई त्यावर लाल शेरा मारून "नाव शंभर
वेळा लिहून आण.." म्हणत..


#SrSatish🎭

-


18 JAN AT 20:41

डोक्यात भिडलेल्या विचारांच्या गुंत्याला लाथाडून विचारचक्र थांबवता आले असते तर..

अति विचार माणसाला स्वतःपासूनच अलिप्त ठेवतात,
हेच खरं.. ♥️

#विचारधन
#शब्द_चांदणं✨
#SrSatish🎭

-


14 JAN AT 17:59

लहानपणी आपल्या प्रत्येकाच्या दप्तरात एक जास्तीची वही असायची, त्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं असायचं, "रफ वही". रफ जरी असली तरीही काही मोजक्या नोंदी त्या वहीतच केल्या जायच्या. "रोजचा गृहपाठ, बाबांनी खाऊ साठी दिलेल्या पैश्याचा हिशेब, मधल्या वेळेत खेळलेले फुल्ली गोळ्याचे ते चौकोनी रखाणे." सगळं काही एकाच वहीत असायचं. माझ्या वहीत तर नावडत्या विषयांच्या शिक्षकांची भोपळ्या सारखी दिसणारी व्यंगचीत्रसूध्दा होती, अगदी त्यांच्या नावांसह.... आठवणीतील काही पानं मागे उलटताना त्या रफ वहीतील पानं सुद्धा डोळ्यांसमोरून निघून जातात. शून्य नजरेने समोरचा रस्ता बघताना मागील काही वर्षांच्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात आणि मन आपसूकच मागे रफ वहीत डोकावतं.

आठवणीतला मी #२
#SrSatish🎭

-


7 JAN AT 20:04

लहानपणी शाळेत जायला मला रोजच उशीर व्हायचा, त्याचं कारण म्हणजे शाळेचे बुट घालताना दोन हातात दोन मोजे घेऊन मी बराच वेळ विचार करायचो की, उजवा कोणता आणि डावा कोणता.. 😁
तेंव्हा एक दिवस कंटाळून बाईंनीच विचारलं, "रोज का रे उशीर होतो?" मी म्हणालो "मोजे समजत नाहीत बाई, कोणत्या पायात कोणता घालायचा.." त्यावेळी बाई म्हणाल्या, "अरे त्यात डावं उजवं काही नसतं, घालायचा कोणताही कोणत्याही पायात.."

आठवणीतला मी.. #१
#SrSatish🎭

-


6 JAN AT 20:27

"आठवणीतला मी.."

एक नवीन सदर, जिथे भावना आणि संवेदनांना
एक उजाळा मिळू शकतो, या आठवणी काही
मजेशीर तर काही भावनिक स्वरूपात मांडता येऊ
शकतात. या सदरा अंतर्गत तुम्ही सुद्धा तुमच्या
लहानपणीच्या आठवणींना उजाळा देऊ शकता.

#SrSatish🎭

-


3 JAN AT 19:09

"Right Click" करायचं असलं
तरीही आम्ही आधी "Left Click"
करून बघतोच.
"शास्त्र असतं ते.." 😁

#SrSatish🎭

-


21 DEC 2023 AT 22:21

A mirror is only competent to
reflect the present, it cannot
reflect the past or the future.


#SrSatish🎭
#शब्द_गंध💫

-


Fetching Sãtish Rãván Quotes