|| वेध...शोध...बोध ||
शोध घ्यायचाय मला अज्ञाताचा
त्या अगम्य शक्तिचा, चैतन्याचा
अमूर्त तत्त्वाचा ||
बोध होण्यासाठी तप्तरसात
बुडवायचे आहे वॄत्तीला
किती काळाचा हिशोब असेल
कदाचित् जन्म जन्मांतरीचा ||
बोध असावा आत्मतत्वाचा
शाश्वताचा, सुखदुःखाच्या पल्याडचा ||
गतजन्मींच्या डोहात
बोधासाठी शोधाचा ||
कां ही ओढ असावी? मुळाकडे जाण्याची
जेथून आलो आहे तिथेच निमवायचे आहे स्वत:ला ||
हाच वेधाचा अर्थ बोध असावा
शोध घे 'स्व' चा ||
- सरिता कुर्डुकर-
अच्छे कर्म या बुरे कर्म ही
हमारी पहचान है|
नतीजा भी उसकाही फल है
कर्म करनाही हमारा अधिकार है|
कर्म फल पर अधिकार मत जताओ
वो तो उसीपर छोडदो |
यही तो कर्मयोग है
जिसे निभाना हमारा फर्ज है |
-
दिल झुम उठा था
फटी फटीसी आॅखे
उसे देखनेपर मजबूर थी|
छुनेको दिल तडपा था
एक सुंदर सा एहेसास था
बाहें फैलाकर सिमटना चाहा
उतनाही दूर होता गया ||
सरिता....-
शब्दवेडी प्रतिभा माझी शब्द शब्दांत उमलते
निळ्याभोर आकाशाला गवसणी घालते |
शब्दांना कसे कळते भाव अलगद टिपणे
पदर भावनांचे उलगडून दाखवते |
कधी जवळीक,कधी दुरावा कधी दु:खाचे सुर
तर कधी भावभावनांचा फुलोरा
रातराणीवरील गंधीत कोशातील कणांचा फवारा |
प्रतिभेला घुमारे फुटावे शब्दांचे मनोहर लालित्यपूर्ण पदरवांचे
कडाडणार्या विद्युत लोळांचे |
कधी मौनात, कधी यौवनात कधी खट्याळ, कधी जोशात
कधी स्नेहाळ, कधी रूसव्याचे शब्दवेड्या भावभावनांचे....||
- सरिता-
तू क्षणा-क्षणांनी पुढे जातोस
भूतकाळात परावर्तित होतोस
मोजता न येणार्या क्षणांची
मोजदाद ठेवतोस..|
सुखाचे क्षण, दु:खाचे कण
साठवलेल्या भावनांना
वर्तमानात मोकळं करतोस
पाठबळ देऊन कणखर बनवतोस..|
तु नसतास तर वर्तमान घडला नसता
भविष्याचा वेध लागला नसता
भूतकाळातील दगड दिसले नसते
तर जीवन नुसतेच भरकटले असते..|
- सरिता
-
निसर्गाचे देणे, तुझे असते येणे
चिंब भिजवून टाकणार्या थेंबाचे गाणे |
येतोस तरी कसा?
काळ्याभोर आकाशाला लकलकणार्या
विजेच्या तारेची किनार |
ढगांवर ढग आपटून करतोस
गडगडांचे कल्ळोळ
टपोर्या थेंबाचे सडेच्या सडे
मॄद्गगंधाचे उघडतोस कपाट |
साथीला येतात बेडूक राव
करतात कसे डराॅव डराॅव |
पानोपानी झिरपणाऱ्या सरींचे
उलगडतात चमचमणारे कलाबूत
न्हाऊन निघते धरणी, झाडे आणि वेली,
मोरपंखींच्या नॄत्याने रोमांचित होते अवनी |
गाई गुरे पक्षी होतात सारे बेभान
छोटे मोठे देतात टाळ्यांचा प्रतिसाद |
कागदी होड्या होतात सज्ज धावण्या,
वळणं घेत घेत गाठतात आपला पल्ला
भेगाळलेली ही धरा आनंद विभोर होते
सॄजन होण्या काळी माती सलज्ज होते |
निसर्गाचं हे देणं सॄष्टिसाठी वरदान
नदी, नाले,ओढे, विहिरी,भागवती तहान |
या सुखलहरींनो मुक्त पणे बरसा
स्वागतगीत गाते तुमची ही सरिता... ||-
आला आला थेंबातून
जीवन प्रवाह ओतण्या
गर्भारपणाच्या ओझ्याखाली
धरित्रीला पालावण्या ।
गंध मृदेचा, सळसळत्या पानांचा
जिकडेतिकडे खच जलबिंदुंचा
नाजुक थरथर चिंब भिजल्या अधरांचा
सृजनाची ओढ तहानलेल्या धरणीला ।
केकारव होई मत्त.पिसारा मयुराचा
लुकलुकणारा प्रकाश पसरतो काजव्यांचा
ओल्या पदराखाली तृप्तीचा ढेकर होई
अंकुरलेल्या बीजांचा ।।
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
सरिता....-
डोळ्यांच्या कडा ओलावल्या
हात तुझा सोडताना
भितीने शहारल्या होत्या
थिजलेल्या डोळ्यांच्या पापण्या..
- सरिता-
टकराने की हिम्मत रख
चाहे किनारा हो या पहाड
कामयाबी चुमेगी तेरे कदम
बस्स् हौसला बुलंद हो ।।
*****************
सरिता...-
🌸सहज सुचलं म्हणून🌸
*********************
धरती कहे पुकारके
आजा वर्षारानी धुम मचाके
खुशियोंकी बौछार
ठंडा ठंडा माहौल
पेडपौधे निहाल
गिली गिली खुशबू
ले आयी ताजगी
मचलती हुवी
हवा की छमछम
नदीयोंकी मस्ती
भिगा भिगा सावन
जश्न का माहौल
नवनिर्माण की चहलपहल
आजा बरखा रानी
धूम मचाने आ जा
*****************
सरिता...-