22 FEB 2022 AT 0:53

हातात या हा हात दे...
बस एवढी तू साथ दे...
इश्कास या वाढावया,
एक नवखीशी बात दे...
येण्या चकाकी ती नवी,
सोडून तू ती कात दे...
देण्या कसोटी रोजची,
मज तेवढी औकात दे...
मी गझल ती ऐकीवतो,
उस्फूर्त ती मग दाद दे...
करण्या तुझे पाणि ग्रहण,
मज प्रेम नामे जात दे...
©️✒सारंग

- ©️✒सारंग