प्रेम म्हणजे नेमकं काय असतं.....???
खरंच प्रेम हे फक्त प्रेम असतं आणि ते फक्त एकदाचं होतं,
आणि एकावरचं होतं, आणि मनापासून होतं,आणि ते प्रेम आपण कधीच विसरू शकत नाही....
प्रेमात एकमेकांवर हक्क असतं,पण अधिकार नसतं....
विश्वास असतं,पण अपेक्ष्यांच ओझं नसतं....
प्रेम हे फक्त प्रेम असतं,जे फक्त दिवसेंदिवस खोलवर रुजत जातं...कधीच कमी होत नसतं..
प्रेमात कधीच स्वार्थ नसतं,असतं ते फक्त निःस्वार्थ आणि समजूतदारपणा,
प्रेमात ती/तो भेटावंच असं अट नसतं....
प्रेम म्हणजे हे प्रेम असतं आणि ते सगळ्यांच्या नशिबात नसतं..
ना बांधिलकी असतं, न अपेक्षा असतं प्रेम म्हणजे फक्त प्रेम असतं...
ना स्वार्थ असत, ना मी पणा असतं....
एकमेकांच्या आनंदातच दोघांच समाधान असतं...
खूप स्वप्नं असतात,जे एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करण्याचे आश्वासन असतं,
तर काही स्वप्नं पूर्ण होतात..पण काही स्वप्नं अर्धवटच राहतात
खरं प्रेम सहजासहजी मिळत नसतं, त्यासाठी खूप संघर्ष कराव लागतं....
प्रेम हे प्रेम असतं, आणि खरंच सगळ्यांच नशिबात खरं प्रेम नसतं...
दुसऱ्यांच्या खुशीसाठी स्वतःच्या प्रेमाचं त्याग करणं ही प्रेमच असतं,इथे फक्त प्रेमाचं बलिदान होतं आणि ते प्रेम अमर होतं..- santosh hadapad
21 JUL 2018 AT 0:48