4 OCT 2018 AT 20:06

-::निरोप समारंभ::--
निरोप समारंभ या शब्दाने कसा दाटून येतो गळा..
गहिवरते मन ,अन नयन बरसती घळा घळा....ll1ll

कालची ही चिमणी पाखरं, झाली सज्ज घेण्यास गरुडभरारी..
हीच ती वेळ मुलांनो,दाखवा जगास आपली हुशारी....ll2ll

पंखांची कराल थोडी फडफड,तरच येईल पंखाना बळ...
तुम्ही गाठावे शिखर यशाचे,आम्हा शिक्षकांची हीच तळमळ....ll3ll

आयुष्याच्या या पुढील वळणावर, सदा राहावे तुम्ही दक्ष...
जीवनविकासच्या या रोपट्यांचा व्हावा, सावली देणारा वटवृक्ष....ll4ll

करा पराकाष्टा प्रयत्नांची, एकलव्याला ही वाटावे आश्चर्य...
तुमचे यश हीच गुरुदक्षिणा, समाधानी आम्ही गुरुवर्य....ll5ll

वाट भविष्यातील व्हावी सुलभ, ही आम्हा गुरुजनांची इच्छा...
आई, वडील आणि गुरुवर्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....ll6ll

मेहनत आमची यश तुमचे, दोघांतला दुवा आपुली शाळा....
निरोप समारंभ या कल्पनेनेच कसा दाटून येतो गळा....ll7ll

- सुधीर संखे