नव्याचे नऊ दिवस,
जुनं ते सोनं असतं..
नवीन माणसं जोडताना,
जुन्याना तोडायचं नसतं.........-
प्रेमाने विणलेल्या नात्याला,
बघितलं आज उसवताना..
एक एक टाका उखडत होता,
घडी पुन्हा बसवताना..-
शेल चारोळी
जागर करूया आठवणींचा,
आठवणींचा पसरवू सुगंध...
सुगंध कस्तुरीचा फिका,
फिका रातराणीचा ही गंध...-
मी सर्वगुणसंपन्न,गुणांच्या खाणीतील हिरा,
मलाच माझ्यावर होता गर्व...
एकदा सहज तुझ्या चष्म्यातून पाहिलं,
तर अंधुक दिसत होतं सर्व...-
मित्रपौर्णिमेचे ही असते झाड,
तर मी ही केले असते व्रत...
सातजन्माच्या ह्या सवंगड्यांची,
मग झाली असती कायम सोबत...
-
माझ्यातील अहंकाराची दाहकता,
तेव्हाच मला कळली होती...
माझ्या आडोश्याला लपलेली,
सावली जेव्हा जळली होती...-
"सुमन"
मंदिरी आरास रचिले स्वयंवर
तोरण महाद्वारा मांडव सजला
शोभला गाभारा गळ्यामध्ये माला
"सुमनांनी" (1) "सुमनांच्या" (3)
चाहूल आनंदाची शृंगारले पार्थिव
सजला पाहुणा तिरडी सजली
नटला पाळणा ओळख हरवली
"सुमनाने" (2) "सुमनांत" (4)
कोमेजल्या पाकळ्या
मधुरस सरला
सुगंध उरला
"सुमनाला" (5)-
वृद्धाश्रमाच्या उंबरठ्यावर,
डोळे लावून बसलेला तो,सकाळच्या राम प्रहरी...
आज पहिला होता त्याने, लेकाचा dp आणि स्टेटस ची स्टोरी...-
नको कॉपी पेस्ट च्या,शेकडो शुभेच्छा,
आपल्या जिवलगाचा ,यावा एकच फोन...
दुःखात असावा त्याचा, हात खांद्यावर,
"भावपूर्ण श्रद्धांजली" चे,नको कोरडे सांत्वन...-
सण मराठी
मराठमोळी संस्कृती माझी,
मराठमोळे सण.
गोड धोड पदार्थ,मौज मजेचा प्रत्येक क्षण.
पुरणपोळीचा आस्वाद,रंगाची उधळण करीत आली होळी.
चकली,चिवडा,फटाक्यांची आतिषबाजी, घेऊन आली दिवाळी.
दहा दिवसांसाठी घरी,पाहुणा आला बाप्पा.
मोदक लाडू,नृत्य,गायन खूप साऱ्या गप्पा.
सण सुरू झाले की येते खूप मजा.
शाळेला मिळते सुट्टी आणि अभ्यासाला रजा.-