नसतानाही सोबत असते आणि
असताना हवीहवीशी वाटते..
असे मैत्रीसौख्य सर्वांना लाभो. ☘️
-
झाड तोडणाऱ्या आणि
मन तोडणाऱ्या व्यक्ती
सारख्याच भासू लागतात
कारण
जिवंतपणाचं सळसळणार चैतन्य
ते एका क्षणात संपवतात-
ओलेत्या सरींबरोबर मन
तुझ्याबरोबर फिरत असतं
तुझं आणि माझं विश्व
भरभरून जगत असतं
-
सांजवेळी कातरवेळी...
आठवांच्या कुंपणाला
जाग यावी आज पुन्हा...
तीर तुझा झेलण्याला
भावनांचे बीज फुटे ...
मोहरूनी फुलण्याला
पापण्यात दाटलेला...
सोहळा हा सोबतीला
-
चूक झाली फार मोठी
खेळ माझा मांडताना..
हात माझे आज रिते
सुख सारे वाटताना..
गुंततो हा जीव अंती
मौन तुझे ऐकताना ..
डंख बसला आज पुन्हा
त्याच वाटा शोधताना..
-
शांत, अशांत नदीचा तळ
पहूडलेला असतो नि:स्वार्थ
घाईच नसते बहुतेक त्याला कशाची
किंचित ही न हलणारे पाणी पाहत
निपचित झालेला काठ ..
कुठूनच कशी झुळूक येईना वाऱ्याची
म्हणावी वाटतात कधीतरी गाणी पावसाची
खोल डोह डोळे
शोधतात तो तळ
निरव, संत निपचित जलाशय
हवं असतं त्यामध्ये त्यांना
आयुष्याची बेचव झालेली चव
बेरंग झालेला रंग
पण...
तितक्यात वादळ येईल असं वाटतं
भरून आलेलं आभाळ
टचकन सुई टोचावी असं
रीत रित होत जातं..
आता बास्स..
पूर्णपणे फाटून जाईल की काय
अशी भीती वाटते..
ती तशीच निघते..
कोणाचीही पर्वा न करता
शोधते आपल्या घराचा रस्ता
ती सुद्धा बरसत असते ..
रीती रीती होत जाते..
खोल डोह डोळे
अधिकच सुंदर दिसू लागतात..💛-
1. Be bold enough to live life on your terms, and never, ever apologize for it.
2. “There is no end to education."
-
I like the way you look at me
I like the way you respond to me
I like the way you smile at me
And
I like the way you write about me
-
फिर नहीं देखेंगे पलटकर तुम्हें
हाँ.. लौट जायेंगे हम..
जहाँ तूम नही हो..
और ना ही तुम्हारी कोई आहट..
उस जगह से.. उस खालीपन से..
कोई अपनापन नही जतायेंगे हम..
हाँ लौट जायेंगे हम..
जहाँ तुम्हारी परछाई मेरा साथ दे..
और तुम्हारे कदम मेरे साथ मिलकर चले..
वहाँ दोनो का एक आशियां बनाकर...
संग रहने को जी तरसे..
वहाँ.. वापस लौट आयेंगे हम..
हाँ.. लौट जायेंगे हम..-
त्याने काही वाक्ये टाईप केले..
ओळी लिहल्या .. लिहतच गेला...
आणि परत त्या एका झटक्यात डीलिट देखील केल्या
आणि फक्त एवढंच पाठविले..
"काळजी घे तुझी"
तीने सुद्धा मनात येईल ते लिहलं..,
त्याच्या हाताचा स्पर्श,
त्याचा तिच्याकडे राहिलेला रुमाल,
ओल्या काही आठवणी...पुन्हा जिवंत केल्या
आणि परत ते सर्व डिलिट केलं... एका झटक्यात..
फक्त एवढंच उत्तर दिले..
"मी ठीक आहे, तू पण काळजी घे तुझी."-