प्रत्येक दिवस सारखा नसतो
मनस्थिती सकारात्मक ठेवावे...! परिस्थितीस संयमाने हाताळत
स्वकर्तृत्वाने पुढे चालत रहावे..!!
©️✍️ संगीता पालकर-हत्तीमारे, रायगड-
📚शब्दमोहोर📚
क्र.- २
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
भारताची ढाल युवाशक्ती
आज बेरोजगारीत अडली..!
लोकशाहीच्या देशातही कशी?
शासनकर्ती जमात नडली...!!
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
©️✍🏻 संगीता पालकर-हत्तीमारे,रायगड-
📚 शब्दमोहोर📚
क्र. - ३
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
शासनकर्ते असतात
म्हणे जनतेचे सेवक..!
सर्व क्षेत्रात झालेत
तेच जनतेचे मालक..!!
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
©️✍🏻 संगीता पालकर-हत्तीमारे-
विषय: दिशा गुरूमुळे..!
आई आद्य गुरू।हाती पाटी खडू।
दिले बाळकडू।माझ्या जीवा॥१॥
कुंभार मडका।आकार देऊन।
संस्कार लावून।शिष्य घडे॥२॥
चरणाचे स्पर्श।होता जीवनाला।
दिशा प्रवासाला।विद्यार्थ्यांच्या॥३॥
फक्त काया नव्हे।सम्यक विचार।
समृध्द आचार।गुरू असे॥४॥
गुरूविना किर्ती।आहे असा ज्ञानी?।
पाहे विद्या वाणी।जगामध्ये॥५॥
गुरू मार्गे सदा।सत्य शोध असे।
द्वेष,गर्व नसे।त्यांच्या कार्या॥६॥
शब्द अमृताच्या।प्रसादाला घ्यावे।
आत्मतृप्त व्हावे।ज्ञाना वाटे॥७॥
अन्याय विरूद्ध।लढ विरांगना।
ज्ञान 'स्व'रक्षणा।गुरू मुळे॥८॥
संगीताला पुज्य।ग्रंथगुरू आहे।
स्वप्न पूर्ती पाहे।आयुष्यात॥९॥
©®
कु.संगीता सुरजलाल हत्तीमारे
(विजया)जि.गोंदिया.-
विश्वमानवतेची शिकवन देई,
प्रेरणेचा लखलखणा तारा...!
युवकांचा दिपस्तंभ झाला,
तत्वज्ञानाचा उत्फूर्त झरा...!!
-
विषय:आस
आस आसमंतापरी
कलली पृथ्वी आसावरी..!
आस असे जन्मांतरी
आस भरी,आस उरी..!!
संगीता हत्तीमारे(विजया)
-
गुलाब का फूल ही
अंत तक सुगंध देता है!
क्यो की उसके डालपर
हरतरफ काटे रहते है!!
- संगीता हत्तीमारे (विजया)
-
तुझ्या लेखणीतील भावगंध
रातराणी सम त्यास सुगंध...!
दरवळला बघ चौहीकडे
प्रकाश त्याचा मंद मंद...!!-
हम नही खा सकते
थंडी का मोसम है..!
दात,मसूळोका ध्यान रकते
उसे वही रख देते है..!!
-
🌞विजयाचे सुविचार🌞
🎉क्रमांक 101🎉
"कितीही वैभव आले तरी माज येऊ देऊ नये,आळशात खिळून राहू नये,हाती घेतलेल्या कामाचा, जवाबदारीचा विसर पडू देऊ नये.कोणतेही काम सुरू करताना जेवढ्या उत्साहाने,चिकाटीने,तळमळीने करीत होतो तोच उत्साह शेवटपर्यंत टिकवून ठेवला पाहिजे.म्हणजे हाती घेतलेल्या कामात विजेता होता येईल"
©️ संगीता हत्तीमारे (विजया)
-