Sandip V Mante  
33 Followers · 41 Following

Joined 5 August 2018


Joined 5 August 2018
23 MAR 2022 AT 9:25

'फुलपाखरू'

विसरुन जाय मी स्वप्नात माझा गाव
वास्तवात मना निपजो न दे हाच घाव

कोणता धडा शिकवला असा आयुष्या
शाळेत नव्हता शब्द माझ्या 'निराशा'

जसजसे अंगी आले शहाणपण मोठेपण
तस-तशी चिघळत गेली माझी जखम

रांगणे रंगून जाते इवल्याशा आयुष्याचे
त्याचसाठी यावे परतून बालपण माझे

उमल माझे नव्याने पुन्हा व्हावे लेकरू
फुलांसवे बिलगण्या व्हावे फुलपाखरू

-कवी मंगेश💕

-


10 MAR 2022 AT 8:45

आई,
तूच आम्हा पंख दिले
स्वतः झेलले खडे इथले
उंबऱ्याबाहेर घेऊन आलीस
अन, उडण्याचे धडे दिले

-कवी मंगेश💕

-


16 JAN 2022 AT 0:32

दिवस उंबर-फुलाच्या आशेने सरले
मोहरीचे फुल होऊन नाचणे पुरले

उरलेच जे जे असेल तर बघ एकदा
की बागमाळ्याचेही कान हवेने भरले

-कवी मंगेश💕

-


21 DEC 2021 AT 8:58

झेलली वादळे कित्तेक या खांद्यावरी आजवर
पण आता वादळेही फार इमानदार नाही

-कवी मंगेश💕

-


4 DEC 2021 AT 6:06

वाटून घेऊ
थंडीचं हे ओझं..,
थोडं तुझं..
थोडं माझं..

-मंगेश💕

-


26 NOV 2021 AT 16:28

रात्र रात्र मला झोप लागत नाही
अन तू म्हणतेस की,
मला आठवण येत नाही?

-


18 NOV 2021 AT 19:54

लिहून पुसत राहतो ओळी काही..
अजूनही विचारण्यास हिम्मत नाही

-कवी मंगेश💕

-


8 NOV 2021 AT 10:44

कोणत्याही वेळी दाटू शकते भावना
एकतरी जीवाचा मित्र हाताशी ठेवा
-मंगेश💕

-


4 NOV 2021 AT 6:39

दिव्याने दिवा पेटावा
दिवाळी अशी असावी
आपल्या घरा सारखी
झोपडी सुद्धा हसावी
-कवी मंगेश💕

-


16 MAR 2021 AT 23:38

कुणाचं आभाळ होणं
खूप अवघड असतं,
कारण अथांग होणं
एवढं सोपं नसतं

-कवी मंगेश💕

-


Fetching Sandip V Mante Quotes