थोडासा वेळ काढशील
का माझ्यासाठी...??
खूपकाही नाही पण मोजकं
तरी बोलशील का माझ्याशी??
विसरून सारंकाही
मारशील ना मिठी जराशी??
सांग ना यार
बट्टी करशील माझ्याशी??
-
आता हिम्मत नाही हरायची..
दुःखाला गाडून खोल खोल
फक्त सुखाची उधळण करायची.. read more
तू भेटणार नाहीस म्हणून
चेहरा थोडा पडलेलाच होता...
पण अचानक तू समोर येताच
क्षणभर...
काल माझ्या काळजाचा ठोका
तुझ्यासाठी चुकला होता...-
जल्दी जागना हमेशाही
फायदेमंद होता है...
फिर वो नींद से हो
या किसी वहम से...-
तू रडलास काय.. किंवा हसलास काय?? कुणी येत नाही विचारायला...कोणाला काहीच फरक पडत नसतो. मग तू दुःखी का आणि कोणासाठी होतोयस?? प्रत्येक जण आपल्या कामात असतो. आहे का कोणाकडे वेळ तुझ्याकडे लक्ष द्यायला. मग का अपेक्षेचं ओझं बाळगतोस तू?? जसं असेल तसं स्विकारायला शिकायचं आणि एकंच म्हणायचं चलो ये भी सही है...
-
म्हणजे नक्की काय?
उंबरठा म्हणजे मर्यादाच ना..?
तसं बघावं तर मर्यादा या माणसांनी स्वतःच घालून घेतलेल्या असतात.
मर्यादा या परिस्थितीमुळे ही येवू शकतात.
आणि मनाचं म्हणाल तर मन एक अशी गोष्ट आहे ज्याला कुणी कधी पाहिलेलं नाही पण असतं ते प्रत्येकाकडे.
भावना आणि मन कितीही झालं तरी दोन टोकं. भावना व्यक्त करता येतात पण मनाचं तसं नसतं ते वेडं एका सेकंदातच असंख्य ठिकाणं फिरून, अगणित विचारांना स्पर्श करून येतं. शेवटी अजून एक प्रश्न...भावना या मनातंच असतात ना..मग मन त्यावर मर्यादा का नाही घालू शकत??? छे हो विषय भलतीकडेच जातोय...असो शेवटी काय मनाचा उंबरठा जाणून घेणे महत्त्वाचे...
-
जो तू चाहे वही कर...
अगर गिर गया तू
तो उठ, चल, दौड फिर भाग...
लेकिन तुझे जो करना है
तू वही दिल से कर...
तैरना तो सीख ही
जाएगा तू...
बस खुदपर विश्वास रख...
-
सदैव चालत रहाणे
हेच आपले काम...
कित्येक संकटे,
नवी वळणं जरी आली
तरी सोडायचा नाही
आपण आपला थाट..
लाभलेले आयुष्य सुंदर
बनवून...
मिळेल ते गोड मानून
करून घ्यावे मनाचे समाधान ...
-
असह्य होत्या भावना...
रीतं झालं मन तेव्हा
बोलक्या झाल्या अश्रूधारा...
-
अगणित देवस्थाने जरी
फिरून झाली तरी...
जे सुख आणि समाधान
आई-बाबांच्या सेवेत मिळेल
ते कुठेच मिळणार नाही.-