ओठांना ओठ आपले भिडलेत बघ...
पाऊस कोसळू लागलाय मग.-
Mom's 1st kiss on 13/7
Whatsapp - 9595801717
Insta - ... read more
बाहेर कडक उन्हाळा,आत 23 डिग्रीवर लावलेला AC, पहाटेच्या वेळी डोळे उघडायला लावणारं खिडकीतून माझ्या डोळ्यांवर येऊन पडणारं कोवळस ऊन,तुझ्या अतृप्त करणाऱ्या सुगंधाने गंधाळलेला वारा,माझ्या गालांवर तुझ्या ओठांचे उमटलेले ठसे, बाहेर बाल्कनीत वाफाळलेला कॉफीचा कप घेऊन उभी असणारी तू,
केस एका बाजूला सावरत असताना त्या केसांसाठी शहिद होणारा तुझ्या मानेवर रेंगाळत असणारा घामाचा तो थेंब, विस्कटलेल बेडशीट बाजूला सारून तुझ्या जवळ येऊन तुझ्या नकळत तुला मागून मिठीत घेणारा मी, मला जवळ ओढत ती मिठी आणखी घट्ट करणारी तू......
तू उन्हाळ्यातील गारवा, AC तील उकाडाही तूच.-
एका अंधाऱ्या रात्री जेंव्हा रस्त्यावरील light bulb चा मंद प्रकाश खिडकीतून येऊन तुझ्या वक्राकार शरीराशी खेळत असेल, जेंव्हा त्या अंधाराला छेदत एक काजवा तुझ्या ओठांना प्रकाशमय करत असेल, जेंव्हा पावसाचं पाणी खिडकीला धडकून तुझ्या चेहऱ्यावर उडत असेल, जेंव्हा एक फुलपाखरू आसरा शोधत तुझ्या खांद्यावर येऊन बसलं असेल,जेंव्हा मातीचा सुगंध घेऊन येणारी वाऱ्याची एक झुळूक तुझ्या केसांना तुझ्या चेहऱ्यावर आणत असेल,जेंव्हा माझे हात तुझ्या कंबरेभोवती ताल धरत असतील,जेंव्हा तुझे गरम श्वास माझ्या ओठांना न्हाऊ घालत असतील,जेंव्हा तुझे डोळे माझ्या डोळ्यांना विचारत असतील......आता कशाची वाट पाहत आहेस वेडया ?
-
Every girl is romantic she just want a perfect boy who switch ON this...
-
अवकाळी भरून आलेले ढग, बेधुंद सुटलेला वारा, वाऱ्यामुळे सळसळत असणारी झाडाची पाने, कडाडणाऱ्या विजा, गॅलरीत लावलेल्या सदाफुलीवर येऊन पडलेला पाण्याचा एक थेंब, हातात वाफाळलेल्या कॉफीचा कप, काही क्षणातच सुरू झालेली पावसाची रिपरिप, साडीला सावरत चिंब भिजून घरात थेट गॅलरी मध्ये धावत येणारी आणि हातातला कप हिसकावून घेऊन थेट ओठांना लावून "सुकून हे रे..." म्हणणारी तू आणि तुझ्या साडीमधून दिसणाऱ्या भिजलेल्या कमरेभोवती हात घालून तुला जवळ ओढून "अब असली सुकून हे......" असं म्हणणारा मी.
-
असेच एका रात्री चांदणे चम चम करत असेल, आकाश चांदण्यांनी भरून गेलं असेल आणि त्या चांदण्यांच्या प्रकाशाच्या रूपाने जणू आकाशच जमिनीवर उतरलं असेल, या साऱ्यात तो चंद्र कोठेतरी लपून बसला असेल आणि तेवढ्यातच त्या जमिनीवर पसरलेल्या चांदण्यातून तू समोरून चालत येत असशील, त्या मंद पडलेल्या प्रकाशात तुझं निखळ सौन्दर्य आणखीनच गूढ बनलं असेल, ते गूढ सोडवण्याची चंद्रालाही हाव सुटेल आणि लपून बसलेला आकाशातील चंद्र जमिनीवरील चंद्रासाठी बाहेर पडेल...
-
असेच एका रात्री चांदणे चम चम करत असेल, आकाश चांदण्यांनी भरून गेलं असेल आणि त्या चांदण्यांच्या प्रकाशाच्या रूपाने जणू आकाशच जमिनीवर उतरलं असेल, या साऱ्यात तो चंद्र कोठेतरी लपून बसला असेल आणि तेवढ्यातच त्या जमिनीवर पसरलेल्या चांदण्यातून तू समोरून चालत येत असशील, त्या मंद पडलेल्या प्रकाशात तुझं निखळ सौन्दर्य आणखीनच गूढ बनलं असेल, ते गूढ सोडवण्याची चंद्रालाही हाव सुटेल आणि लपून बसलेला आकाशातील चंद्र जमिनीवरील चंद्रासाठी बाहेर पडेल...
-
साडी डे च्या दिवशी काहीतरी निमित्त काढून तिच्या कॉलेजवर तिला भेटायला जाणार मी,कॉलेजवर जिकडे पाहावं तिकडे ऊतू जात असणार सौन्दर्य,इकडे तिकडे पाहत असतानाच एकदमच समोरून पुढे येऊन उभा राहिलेली ती,चेहऱ्यावर न जाणवणारा केलेला मेकअप(कारण करावा लागतंच नाही तिला),ओठांवर फिकट लाल लिपस्टिक,खांद्यावर रुळणारे स्ट्रेटलाईन केलेले केस,नाकावर चमकणारी नथ आणि गळ्यातील अस्सल मराठमोळी साज...देवाsssss जन्नतच रे
थंड वारं सुटलं असूनही जाणवणारा उकाडा, "कशी दिसतेय मी ?" असं विचारणारी ती,आणि तिच्यासाठी घेऊन गेलेला गजरा खिशातून काढून तिच्या हातावर ठेवत "फक्त एवढंच बाकी आहे आता..." अस म्हणणारा मी, आणि या साऱ्या आभूषणांवर मात करत तिच्या केसांत जाऊन विसावणारा तो नशीबवान #गजरा
-