जीवनाच्या वाटेवर चालत असताना वेळोवेळी दिशादर्शक, मार्गदर्शक,प्रेरणा व जगण्याचा हुरूप देणाऱ्या सर्व शिक्षक, पालक,मित्र,मैत्रिणी,
विचारवंत,महापुरुष व सर्व समाजातील आदर्श व्यक्ती ज्या जीवनावर प्रभाव टाकतात व आयुष्याला वेगळ्या उंचीवर जाण्यासाठी योगदान देतात त्या तमाम मार्गदर्शकांना
गुरु पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.-
Lives in Maharashtra (Parbhani)
संस्थापक-चार्वाक दर्शन मंच
संचालक-अन्नदाता कृ... read more
महाराष्ट्र कृषि दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
टीम-चार्वाक दर्शन मंच
"वास्तववादी,चिकित्सक
विचारांची गौरवशाली भारतीय सभ्यता"-
पावसाचा रॅक लागलं का...?
पेरणी पुर्ण होईल का,
कोरड्या मातीत टाकलेलं बी उगवलं का
पावसाचा रॅक लागलं का....?
बैलजोडी,ट्रॅक्टर आनंदाने काम करताना दिसतील का,
कोरड्या मातीला पाहून आकाशाचा पाझर फुटेल का.
पाझराच्या आशेवर धान उगवून दिमाखाने मान डोलावेल का,
पावसाचा रॅक लागलं का....?
काळी आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना आई सांभाळून घेईल का,
पाऊस धो-धो येऊन काळ्या आईची कूस आनंदाने बहरेल का.
पावसाचा रॅक लागलं का....?-
ते लव्ह लेटर तुला द्यायच होतं.....
ते लव्ह लेटर तुला द्यायच होतं पण हिम्मत झाली नाही.
हिम्मतीची गंम्मत झाली असती आणि गमतीची भली मोठी किंमत झाली असती.
मनातल सांगून आयुष्यात आणायच होतं.
आयुष्यात आणून प्रेमाचं चांदणं करायच होतं.
पण चांदणं तर सोडा इथं
हिम्मत आणि किम्मत सुट्टीवर गेली.
लव्ह लेटर बॅग मध्येच राहील.
राहिलेलं आयुष्य बॅग कडे बघण्यातच गेलं.
तीच हसणं पाहूनच कॉलेज सोडल.
कॉलेज सगळं स्वप्ननातच राहीलं.
थोडी हिम्मत केली असती तर आजचं जगणं वेगळं असतं.
आता जुन्या कडीला ऊत कशाला म्हणून ते लव्ह लेटर स्वतः च वाचून शांत बसत असतो.
पण तरी कधी कधी वाटतं
ते लव्ह लेटर तुला द्यायच होतं.-
तिचा सहवास नसताना व्याकुळ होतो मी.
तिच्या डोळ्यात पाणी पाहून व्याकुळ होतो मी.
तिच्या भेटीसाठी व्याकुळ होतो मी.
तिच्या दुराव्यामुळे व्याकुळ होतो मी.
माझ्या आयुष्यात ती नसेल तेव्हा तेव्हा
व्याकुळ होतो मी......
-
बघ माझी आठवण येते का....
वाऱ्याची झूळुक येते त्यात वाळलेलं पान जेव्हा तुझ्या गालावर येऊन चिकटत तेव्हा
बघ माझी आठवण येते का.
प्रचंड उन्हात घामाच्या धारा तुझ्या गालावरून तरंगतात तेव्हा बघ माझी आठवण येते का.
पावसाच्या सरी कोसळतानाचा मंद आणि गोड आवाजा येतो तेव्हा बघ माझी आठवण येते का.
सायंकाळी गच्चीवर फिरताना एखादं पाखरू डोळ्यसमोर घिरट्या घालतं तेव्हा
बघ माझी आठवण येते का.
कडाडनाऱ्या विजेचा लक्ख करणारा प्रकाश डोळे दीपवतो तेव्हा
बघ माझी आठवण येते का.
आकाशात इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण पाहून मन प्रसन्न होतं तेव्हा
बघ माझी आठवण येते का.
शेतात काळ्या मातीवरून चालताना मातीची कणं पायाला चिकटतात तेव्हा
बघ माझी आठवण येते का.-
तुझ्या आठवणीच ओझ वाहत बसलोय.
जुन्या काळातील प्रसंग आळवत बसलोय.
नव्या प्रसंगांना परीक्षा समजत बसलोय.
जुना काळ,जुन्या व्यथा जगाला सांगत बसलोय.
जीवनाच्या क्षणांची वजाबाकी करत थकलोय.
तुझ्या आठवणीच ओझ वाहत बसलोय.-
#Dandi_March
भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता.
यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.
याचे नेतृव मोहनदास करमचंद गांधी (महात्मा गांधी) यांनी केले.
आज रॊजच्या जेवणात मीठ ह्या जीवनावश्यक वस्तुवर कर नाही त्याचे श्रेय महात्मा गांधी यांना जाते.
रोज जेवताना त्याची आठवण ठेवली तरीही खूप झाले असं मी म्हणतो.-
रोजच्या नजरानजरेतून बोलायचं
होतं खूप काही सांगायचं होतं.....
मनातला अबोला,रुसवा,फुगवा
ओठांवर आणायचं होतं खूप काही सांगायचं होतं....
कोंडून घेतलेल्या अश्रूंचे बांध फोडायचे होते
खूप काही सांगायचं होतं....-