शब्द सारे परके झाले
अश्रु असे वाहून गेले
तुझ्या आठवणीत सखे
जगणे माझे राहून गेले
🎻संदीप ढाकणे
7588512467-
तुझी आठवण येते
प्रेमाची साठवण होते
रित्या मनात माझ्या
वेदनाची गाठभेट होते
-संदीप ढाकणे-
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
*गुरुजी*
ज्ञानाची पेरणी तुम्ही
गुरूजी केली कष्टाने,
स्वप्नाच्या दुनियेलाही
दिशा दिलीत जिद्दीने ||
कधी पाठीवर थाप
कधी हातावर वार,
निरागस फुलासाठी
वेचला काटयाचा भार ||
बोलक्या फुलांना तुम्ही
गंध देऊन गेलात,
गुरूजी आमच्या मनात
घर करून गेलात ||
प्रकाश दिला आम्हांला
किती झेलला अंधार,
तुमच्या कार्याची थोरवी
नाही शब्दात मावणार ||
मनात प्रेरणेची भरारी
तुमच्या शब्दाची महती,
साकार करायला स्वप्ने
आता तुमच्या वाटेवरती ||
काव्यरचना
संदीप ढाकणे,7588512467-
दवबिंदू
अलवार क्षणाच्या मोहात
दवबिंदू फुलास बिलगला ।।
क्षणिक घटिकेचे जीवन
रस अमृताचा प्याला ।।
काटयातल्या फुलाला
ओलावा स्पर्शाचा दिला ।।
शहारून आले सारे अंग
रंग गुलाबी कसा लाजला ।।
तप्त उन्हाच्या किरणांनी
घात दवबिदूंचा केला ।।
चटके फुलास देताना
दवबिंदू करपून गेला ।।
मिलनास आतुरलेला थेंब्
श्वास सुगंधात सोडला ।।
🍀काव्यरचना🌿
✍🏻संदीप ढाकणे🎭-
जा जिंदगी से दूर अब..
तुझे खोने का गम नहीं ।
तेरी यादे मिली जीने के लिए
यह भी कुछ कम नहीं ।
संदीप ढाकणे
7588512467-
परतीच्या वाटेवर
मन पडले एकाकी
कधी येशील स्वप्नात
एवढीच आस बाकी
संदीप ढाकणे
7588512467-
तुझ असणं,तुझ नसणं
हळूच माझ काळीज चोरणं
तुझ असण,तुझ नसणं
ऱ्हदयावर माझ नाव कोरणं
संदीप ढाकणे
7588512467-
तुळस
दारी मंडप सजले
डोळे अश्रुत भिजले ।।
घेता पाखरे भरारी
लेक चालली सासरी ।।
कशी मायेची पाखर
दाटे मनात काहूर ।।
लेक आईची तुळस
बाप सांभाळी कळस ।।
बाप करी कन्यादान
विसरून देहभान ।।
🌱काव्यरचना🌱
संदीप ढाकणे
7588512467-
बैलपोळा
बैलपोळ्याचा रे सण
ऋण फेडण्याचा वाण
उपकाराची रे फेड
तुझ्या सुखाने करीन ||
तेल,तुप,हळदीने
करू दे खांदेमळणी
गळयात घागर माळ
छान दिसते शोभूनी ||
ओवाळीतो जीव माझा
तुझ्या रूपात माऊली
तुझ्या घामाच्या धाराने
धरतीही सुखावली ||
आठवणीचे रवंथ
चाले माझ्याच मनात
कधी चाबकाचा वार
झेललास काळजात ||
तुझी सारी रे हयात
गेली माझ्याच शेतात
सोन्या चांदीची पेरणी
झाली तुझ्याच कष्टात ||
🌿काव्यरचना🍀
संदीप ढाकणे-