पावसाच्या सरी धरणीबरोबर मनालाही आठवणींत चिंब करून जातात...
धरणी उन्हाने परत सुकी होते, पण मन मात्र तसचं चिंब राहतं...❤️🩹-
पाऊस असा बेभान बरसू लागला
कि वाटतं...
खूप खूप भिजावं, चिंब व्हावं
पण पाण्यासोबत आठवणींच भिजणं होतं,
म्हणून चिंब होण सोडलयं आता...-
मैं अक्सर हार जाती हूँ किसी की जीत की खातिर...
मेरा अपना तरीका है... हर किसी से जीत जाने का...!!-
जे सांगता नाही आलं पाहिजे,
आणि
त्याला कधी समजलं सुद्धा नाही पाहिजे...
इतकं जपावं एखाद्याला...
पण हे जपणं त्रासदायक नसावं...
ते आहे म्हणून रुबाब नसावा...
ते निर्मळ असावं, स्वतःसाठी असावं...
इतरांना जरी कधी दिसलचं तरी...
ते फक्त क्षणिक असावं...
शेवटी जपणं काय ते... येतच...कारण,
काही गोष्टी, काही विचार
आणि
काही व्यक्ती....
असतातच मुळात सुरेख...
अगदी जपण्यायोग्य......🖤🖤🖤-
कुछ नजदीकियों ने ही बुझा दिए हैं
मेरे राह के दिये...
अब रोशनी के लिए
खुद को ही जलना होगा...
कुछ आँसू पोछने वाले हाथ भी
वार करने लगे हैं...
तब ऑंसुओ को भी तो सोच संभलकर
गिरना होगा...
-
कधी कधी वाटतं....
कधी कधी वाटतं....
खूप दूर निघून जावं या दुनियेतून..
इतक्या दूर....
जिथे कोणाला आभास देखील होणार नाही ..
मी असल्याचा वा नसल्याचा ..
ना कोणी माझी वाट बघत असेल,
ना मी असेन कोणाच्या प्रतिक्षेत..
जिथे कोणावरही माझा भार नसेल,
ना असतील माझ्याकडून काही अपेक्षा..
जिथे मला कोणी माझ्या पैशाच्या श्रीमंतीने ओळखणार नाही,
कोणी माझ्या नावाचा फायदा घेण्यास कारण शोधणार नाही..
जिथे उदास असणार्यांना हसण्याचं सोंग करावं लागणार नाही,
जिथे जगण्यासाठी रोज रोज मरावं लागणार नाही..-